ताज्या बातम्या

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

चोपडा प्रतिनिधी – विनायक पाटील

चोपडा- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक, शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, समन्वयक अश्विनी पाटील, दीप्ती पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पाटील आणि आर्या सोनवणे या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा….या गीताचे सामुदायिक गीत गायन केले. शाळेतील शिक्षिका कामिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची माहिती सांगितली. अंशिका पाटील आणि संस्कृती शिंदे या विद्यार्थिनींनी देखील शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची सविस्तर माहिती सांगितली. जीत पाटील या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. इयत्ता २री आणि ३ रीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना वंदना करणारे नृत्य सादर केले. अनुष्का सुर्वे या विद्यार्थिनीने जिजाऊ मासाहेबांच्या वेशभूषेत जिजाऊंचे मनोगत व्यक्त केले. अनुष्का सुर्वे आणि नैतिक पाटील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समूहगीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *