औरंगाबाद येथून मंत्रालयावर तिरंगा रॅलीचे आयोजन
मार्शल अर्पित वाहाणे
वर्धा – आज २३ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून मंत्रालयावर तिरंगा रॅली मुबई येथे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या तयारीसाठी राज्य येथे सकल मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच मुस्लिमांचे आदर्श पैगंबर मोहम्मद स. यांच्या विरोधात गरळ ओकून रामगिरी महाराज यांनी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा भोंदू महाराजाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उपस्थित राहून पाठराखण करत आहेत. तर मस्जिद मध्ये घुसून वेचून-वेचून मारण्याची मुस्लिमांना धमकी देणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की, नाही ? असा प्रश्न पडतो आहे. यामुळे शासनाला महाराष्ट्र संविधानाने चालेल तुमच्या दादागिरीवर नाही हा इशारा देण्यासाठी समस्त मुस्लिम बांधवाना २३ तारखेला मुंबई येथे जायचे आहे. तर सध्या गटातटाच्या राजकारणात अडकून पडण्याची वेळ नसून मुस्लिम म्हणून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन मा. खा जलील यांनी केले आहे. यासाठी वर्धा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाली असल्याची माहिती वर्धा शहर अध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी दिली.