कजगांव ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाकडे तक्रार दाखल
![](https://loknayaknews.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-09-at-10.08.09-PM.jpeg)
भडगांव प्रतिनिधी / आमीन पिंजारी
कजगाव भडगांव येथील ग्राम विकास अधिकारी श्री नारायण शिवराम महाजन यांनी 15 वा वित्त आयोग या खात्यावरून गटार साफसफाई करणाऱ्या ईसमा च्या नावाने लाखो रुपयाचे बीले अदा करून शासनाची फसवणूक करून कजगाव ग्रामपंचायत येथे मोठा अपाहार केला असल्याची तक्रार कजगावं येथील रहिवासी रामकृष्ण शिवाजी बोरसे यांनी दिनांक 2/1/2025 रोजी राज्य माहिती आयोग खंडपीठाकडे लेखी तक्रार केली असल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे, कजगाव येथील ग्राम विकास अधिकारी नारायण शिवराम महाजन यांनी 15 वा वित्त आयोग या खात्यावरून गटार साफसफाई करणाऱ्या. इसमा च्या नावाने बीले अदा करून शासनाची फसवणूक केली असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे, तरी राज्य माहिती आयोग खंडपीठाने आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून सदर दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्जदार श्री रामकृष्ण शिवाजी बोरसे यांनी केली आहे.