कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र भगवान महाजन यांची आत्महत्या

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव – येथील लहान माळीवाडा परिसरात राहणारे शेतकरी राजेद्र भगवान महाजन वय 41 यांनी कर्जबाजारी असल्यामुळे आत्महत्या केली आहे ते त्यांची आई -गंगुबाई, पत्नी- सुरेखा राजेद्र महाजन व दोन मुलासह राहत होते. राजेद्र महाजन हे शेती व्यवसाय करुन त्यांचे परिवाराहचा उदरनिर्वाह करीत होते त्यांची शेती गारखेडा शिवारात असुन त्यांचेवर कर्ज असल्याने ते नेहमी चिंतेत राहत होते त्यामुळे दि. 13/05/2025 रोजी सकाळी त्यांनी दुपारी 01.00 वाजेच्या सुमारास राजेद्र भगवान महाजन यांनी त्यांचे राहते घराचे मागील खोलीत छताला लावलेल्या पंख्याला बेडसिट बांधुन गळफास घेतला आहे राजेद्र महाजन यांना ग्रामीण रुग्णालय धरणगांव येथे आणले असता असता साडु राजेद्र महाजन यांना तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले विठोबा दगा महाजन वय 39 वर्ष धंदा शेती रा.लहानमाळीवाडा धरणगांव यांच्या खबरीवरून धरणगाव पोलिसात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.