कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त एक दिवसीय शिबिर उत्साहात साजरे

दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त एक दिवसीय शिबिर उत्साहात साजरे झाले.
या शिबिराच्या प्रथम सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए डी वळवी हे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख अतिथी मनोगत डॉ. संजय शिंगाणे, विभागीय समन्वयक रा.से.यो. चोपडा विभाग, माजी विद्यार्थी श्री कैलास महाजन तसेच स्वयंसेवक दिनेश यांनी व्यक्त केले. यानंतर राज्यपाल वन घन योजनेअंतर्गत महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
द्वितीय सत्रामध्ये स्वच्छता ही सेवा या अंतर्गत धरणगाव रेल्वे स्टेशन स्वच्छता करण्यात आली.
या क्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती महाजन , प्रास्ताविक डॉ. अभिजीत जोशी, तर आभार प्रा. योगेश पाटील यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. वारडे, डॉ.केंद्रे,डॉ.सुखदाणे डॉ.बोंडे,प्रा.पळखे,डॉ. गौरव महाजन, शिक्षकेतर कर्मचारी तसेच रासेयो स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.