काम,क्रोध,मत्सर,लोभ यांच्यावर मात करण्यासाठी नामसाधना गरजेची : समाधान महाराज शर्मा

भर पावसातही श्रद्धेचा महापूर : शिवमहापुराण कथेस भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
लोकनायक गंगापूर/प्रतिनिधी अमोल आळंजकर
मनुष्य जीवनाच्या विकासातील मार्गावरील प्रमुख अडसर असलेल्या काम, क्रोध, मत्सर, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी नामसाधना गरजेची असल्याचे प्रतिपादन कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी गंगापूर येथील शिवमहापुराण कथेचे पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले.पाचव्या दिवसाची शिवमहापुराण कथा सुरू होण्यापूर्वी गंगापूर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरूवात होऊनही भाविकांनी हजारोच्या संख्येत भिजत येऊन कथेला हजेरी लावली. यावेळी जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णाताई जाधव, आयोजक संजय जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होती. समाधान महाराज पुढे म्हणाले की, लहान मुले ही तुमच्या व देशाचे उद्याचे भविष्य आहे त्यामुळे त्यांना चांगले संस्कार द्या, मोबाईलला पासवर्ड देऊ नका जे पासवर्ड ठेवतात त्यांच्या मनात पाप असते.शर्मा महाराज पुढे म्हणाले की, विपरित परिस्थितीचा अनुभव आल्याशिवाय प्रगतीचा मार्ग सापडत नाही, जीवनात वनवास आला तरच जीवनात सुवास येतो, आपले राहणीमान साधे ठेवा, श्रीमंतीचे प्रदर्शन करणे चुकीचे आहे. यावेळी लक्ष्मण कदम, दिपक कदम, गोपाळसेठ राउत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष अंबिलवादे, कृष्णा पाटील, रामेश्वर नावंदर, सुरेश नेमाडे,योगेश पाटील मुकुंद जोशी, सोपान देशमुख,विशाल दारूंटे,शरद दारूंटे,अनिल जाधव,गोपाळ राऊत, बाबासाहेब लगड,यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.