ताज्या बातम्या

किंनगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी “आयुष्यमान भव” मेळाव्याचा घेतला लाभ

डॉ.मनिषा महाजन ठरल्या माणसातील देव

किनगाव ता-यावल.. दि.८ ऑक्टोबर २३ रविवार रोजी, ‘आयुष्यमान भव’ या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र-किनगाव ता-यावल जि-जळगाव येथे डॉ.मनिषा महाजन, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र-किनगाव,यांच्या संकल्पनेतून तथा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.राजू तडवी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली,सदरचा “भव्य आरोग्य तपासणी मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या आवारात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.या मेळाव्या अंतर्गत आरोग्य केंद्र-किनगाव अंतर्गत येणारे,सर्व उपकेंद्रामधील एकूण-३९६७ ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सदरच्या आरोग्य मेळाव्यातस मा.आमदार श्रीम.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी देखील भेट दिली आणि किनगाव आरोग्य केंद्रामार्फत पंचक्रोशीतील जनतेला पुरविल्या जाणाऱ्या आरोग्याच्या सोयी सुविधा बद्दल, समाधान व्यक्त करून, मेळावा यशस्वीतेसाठी मा.आमदार सौ.लताताई यांनी शुभेच्छा देखील दिल्या. या आरोग्य मेळाव्यामध्ये तालुका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते. मेळाव्यात सर्व तपासण्या ह्या मोफत असल्यामुळे, हजारो नागरिकांनी या शिबिराला प्रचंड गर्दी केली होती. या आरोग्य शिबिरा मार्फत.. सामान्य आजाराचे-१२७० रुग्णांची तपासणी, जनरल सर्जन -१८ रुग्ण,३१५ लहान बालकांची तपासणी, ३८ कुपोषित बालकांची तपासणी, १५२-गरोदर मातांची तपासणी, ५०-स्त्रियांची गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी, ३८-स्तन कॅन्सरची तपासणी, ६५५लोकांनी केली डोळ्यांची तपासणी, ८९०-जनरल फिजिशियन साठी तपासणी, ५२रुग्णांची अस्थिरोग तपासणी, १४४ रुग्णांनी फिजिओ थेरपीसाठी तपासणी, ५३-रुग्णांची मानसोपचार तपासणी, २१४-त्वचारोग साठी तपासणी, ७८ रुग्णांची नाक कान घसा तपासणी, ४४-रुग्णांची दंत रोग तपासणी,तसेच इतर आजारासाठी २२रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या,त्याचप्रमाणे मेळाव्यातील रुग्णांच्या रक्त-लघवीच्या सर्व तपासण्या या महालॅब मार्फ़त सर्व तपासण्या या अगदी मोफत करण्यात आल्या, रोगाचे निदान व लागलीच त्यावर उपचार व रक्त-लघवीचे रिपोर्ट देखील एकाच छताखाली प्राप्त होत असल्यामुळे, पंचक्रोशीतील सर्व जनतेने वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांचे तथा सर्व कर्मचारी वर्गाचे खूपच समाधान व्यक्त करून आभार देखील मानले. सदर मेळाव्यात रेडक्रॉस सोसायटी जळगांव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर रक्तदान शिबिरामध्ये ३२ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून, समाजामध्ये, महान आदर्श निर्माण करून, ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा रक्तदानाचा एक चांगला संदेश दिला, त्याचप्रमाणे सदर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा तात्काळ ५००००/-रुपयांचा विमा देखील काढण्यात आला.तसेच या आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत २७ लाभार्थ्यांचे आभा कार्ड काढण्यात आले.त्यासोबतच ५ लोकांनी आपल्या अवयवदानाची ऑनलाइन नोंदणी देखील करून घेतली. अशाप्रकारे या आरोग्य तपासणी मेळाव्यामध्ये एकूण ३९६७ नागरिकांनी सहभाग नोंदवून, आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. मेळाव्यासाठी खालील तज्ञ डॉक्टरांचे मोठे सहकार्य लाभले, त्यात यावल तालुक्यातील निरामय हॉस्पिटलचे डॉ.देशपांडे, बालरोग तज्ञ-डॉ.प्रशांत जावळे, डॉ.दीपक चौधरी, दंतरोग तज्ञ-डॉ.स्नेहल जावळे, जिल्ह्यातील गोदावरी हॉस्पिटल चे सर्व विभागाचे डॉक्टर्स टिम, तसेच जळगांव चांडक हॉस्पिटलचे नेत्र चिकित्सक-डॉ.निलेश चांडक, कांताई नेत्रालयची सर्व टीम, रेडक्रॉस सोसायटी,जळगाव टिम, पियुष हॉस्पिटलचे डॉ.रोहन पाटील, अस्थीरोग तज्ञ-डॉ.अभिजित पाटील, कॅन्सर तज्ञ-डॉ.प्रशांत चोपडा, डॉ.सागर पाटील, डॉ.प्रफुल काबरा, जनरल फिजिशियन- डॉ.सुनिल सुर्यवंशी, बालरोग तज्ञ-डॉ.हेमंत पाटील, जळगाव येथील रक्त संकलन केंद्र रेडक्रॉस सोसायटी, यांचा समावेश होता.तसेच खालील विभागानिहाय व आजाराप्रमाणे तपासणी करण्यात आली, त्यात प्रामुख्याने अस्थीरोग विभाग, त्वचा विभाग , मानसोपचार विभाग,कुष्ठरोग व क्षयरोग विभाग गरोदर माता तपासणी, गर्भाशय कॅन्सर, स्तन कॅन्सर,मुखरोग कॅन्सर,बालरोग तपासणी,कुपोषित बालके तपासणी, सिकलसेल तपासणी, हिवताप व डेंगू तपासणी, मुख कर्करोग तपासणी , डोळे तपासणी ,कान नाक घसा तपासणी, इत्यादी तपासण्या या आरोग्य मेळाव्यात करण्यात आल्या होत्या. या आरोग्य तपासणी मेळाव्यासाठी, यावल नगरपरिषद कडून अग्निशामक दल,फिरते शौचालय, ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली.

सदर मेळाव्याकरिता, यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, येथील समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच किनगाव येथील स्वयंसेवक आदिंनी हा आरोग्य तपासणी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.याचा लाभ सर्व नागरिकांना मिळाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले, आरोग्य मेळावा अत्यंत शांतपणे,आदर्श आचारसंहितेचे पालन करून, यशस्वी करण्यात आला या साठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन डॉ.तरांनुम शेख ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अश्फाक शेख, डॉ.वकार शेख, डॉक्टर मोहसीन शेख, डॉ.धनंजय जोशी ,डॉ.सोनल भंगाळे, आरोग्य सहायिका श्रीम.मंगला सोनवणे, आरोग्य सहायक-सुरवाडे, क.सहा.-जावेद जमादार,आरोग्य सेविका-श्रीम.कविता सपकाळे, श्रीम.मोहिनी धांडे,श्रीम.आफरीन तडवी,श्रीम.शीला जमरा,श्रीम.नवादी बारेला,श्रीम.सुजाता सोनवणे,आरोग्य सेवक-जीवन के. सोनवणे,दिपांकर बर्डे, मनोज बारेला, पवन काळे,परिचर- सरदार कनाशा, कु.पियुष बैरागी, वाहन चालक-कुर्बान तडवी,सफाई कर्मचारी-गोपी सपकाळे,यावल नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, तालुका/जिल्हा आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.या मेळाव्यासाठी सहभागी होऊन लाभ घेतलेल्या जनतेने, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर तथा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.राजू तडवी यांनी डॉ.मनिषा महाजन यांचे कौतुक केले.सदरच्या मेळाव्या विषयी डॉ.मनीषा महाजन याना विचारले असता त्या म्हणाल्या की,”सध्याचे वातावरण पाहता आरोग्य विभागातील असलेल्या अडचणी वर मात करून जनतेला लाभ देण्यासाठी “डॉक्टर आपल्या दारी” या संकल्पनेतून “आरोग्य सुदृढ” आणि “समृद्ध” करण्याचा प्रयत्न, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मी करत रराहील.”असे प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *