जळगांव जिल्हा

कोरपावली येथे कॉपी मुक्त परिक्षेचे मार्गदर्शन आयोजन

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – तालुक्यातील कोरपावली येथील डी. एच. जैन विद्यालयात इयत्ता 10 वी मार्च 2024 साठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान आणि पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी सरपंच जलीलदादा पटेल होते यावेळी विध्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि शिक्षकांनी सदर अभियाना बद्दल व नियोजनाबद्दल इयत्ता 10 वी च्या विध्यार्थ्यांना कॉपीमुक्त परिक्षा ,बोर्डाचे पेपर कसे सोडवायचे प्रश्न कशे लिहायचे 10 टक्के गुण मागच्या वर्षा पेक्षा जास्त मिळवणेसाठी विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास आणि सराव करावा सुट्या लागतील तरी विद्यार्थाना काही अडचण आल्यास त्यांनी शाळेत यावे नक्कीच आम्ही सहकार्य करू अशे आश्वासन शिक्षकांनी दिले या बद्दल योग्य प्रकारे माहिती दिली शाळेतर्फे पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका सी.व्ही.नेहेते मॅडम, अर्चना महाजन मॅडम, दिलीप पाटील सर तसेच पालक दयाराम सोनवणे, फारुख पटेल,भीमराव इंधाटे,अशोक भालेराव, मजित तडवी,आशा तायडे,सुनील महाजन सहित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *