ताज्या बातम्या

क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेमार्फत जनजाती समाजातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप….

धरणगाव - डॉ. हेडगेवार नगर धरणगाव- धरणगाव शहरातील व तालुक्यातील जनजाती बांधवांसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था, डॉ. हेडगेवार नगर धरणगाव मार्फत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उखळवाडी, भामर्डी, बाभुळगाव, चमगाव, पिंपळेसिम ,

अहिरे बुद्रुक,सतखेडे, सोनवद बुद्रुक, सोनवद खुर्द,
वाघळूद खुर्द,हनुमान खेडे, नांदेड कन्या, नांदेड बॉईज,
भोद खुर्द, चावलखेडे, बांभोरी बुद्रुक तसेच एरंडोल तालुक्यातील अनेक जि.प.शाळांमधील जनजाती व भिल्ल समाजातील सर्वच विद्यार्थ्यांना दर्जेदार व यांचे मोफत वाटप करण्यात आले.
संस्थेमार्फत दरवर्षी जनजाती बांधवांसाठी विविध उपक्रम राबविले जातात त्यात सामुदायिक विवाह सोहळा,बालकांची मोफत आरोग्य तपासणी व पूरक आहार वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य पुरवणे व अन्य उपक्रम प्रसंगानुरूप राबविले जातात. मोफत व दर्जेदार व यांचे जनजाती समाजातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यामागे संस्थेच्या उद्देशानुसार जनजाती समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा ह्या उद्देश्याने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
सदर उपक्रम राबवतांना संस्थेचे अध्यक्ष श्री भाईदास सोनवणे,उपाध्यक्ष यशवंत कुवर, सचिव विलास महाजन, सदस्य श्री सोमनाथ भिल, अरुण नाईक, सुखदेव सोनवणे, शिवदास भिल,संजय सोनवणे, समाधान मोरे, एस एस पाटील सर, चेतन कोठारी, युवराज पाटील, रवींद्र चौधरी, पी एन पाटील, भैय्या महाजन,ए.डी पाटील, वाय.डी.बडगुजर शांताराम जाधव व्यवस्थापक श्री अमोल जाधव व प्रत्येक गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी मोफत वह्या वाटप यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *