ताज्या बातम्या

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या नियोजित प्रकल्पास आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ.विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट

डॉ.हेडगेवार नगर ता.धरणगाव – जनजाती समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या व धरणगावच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या नियोजित प्रकल्पास आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ. विजयकुमार गावित यांची सदिच्छा भेट दिली. मा.ना.डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले.सदर प्रकल्प हा धरणगाव व परिसरातील जनजाती बांधवांसाठी क्रांतिकारी पथदर्शी प्रकल्प असेल असे गौरवोद्गार काढले. क्रांतिकारी प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा याबाबतीत काही मदत आवश्यक असेल तर मदतीचे त्यांनी आश्वासन दिले. मा.ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री भाईदास सोनवणे व जनजाती बांधवांनी केले. नंदुरबार तालुका भाजपा अध्यक्ष जयंत पाटील यांचा देखील जनजाती बांधवांनी स्वागत व सत्कार केला. सदर कार्यक्रमाप्रसंगी यावलचे एकात्मिक प्रकल्प अधिकारी मा.श्री.अरूण पवार साहेब, मा. श्री संजय पाटील साहेब उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग , मा. श्री अमोल इनामदार प्रकल्प अधिकारी न्याती कंट्रक्शन,धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री उद्धव ढमाळेसाहेब , धरणगाव पंचायत समितीचे नायब तहसीलदार श्री.संदीप मोरे तसेच जनजाती समाजातील कार्यकर्ते व संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

संस्थेच्या मागील काळातील आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव श्री विलास महाजन सर यांनी प्रमुख अतिथींना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय पी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे ,उपाध्यक्ष श्री. यशवंत कुवर ,संजय सोनवणे महाराज, शिवदास भिल, संस्थेचे सदस्य,व्यवस्थापक अमोल जाधव तसेच सर्व जनजाती समाजातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *