खाकी वर्दीतला ‘माणूस’
जळगांव : पोलिस म्हटले की, खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, कडक शब्दात बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते. पोलीस म्हटले की, ढेरपोट्या पोलिसांचे चित्र डोळ्यासमोर येते. पोलिसांना कर्तत्यव्यासाठी वेळप्रंसगी थोड कठोर व्हावे लागते. अनेक जण पोलिसांपेढ जाण्यास घाबरतात. असे असेल, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन, भावना असतात डुयटीसाठी कठोर बनेलला हा वर्दीतील माणुस वेळप्रंसगी मनाने तितकाच मृदु होतो. बारा-बारा तास काम करताना पोलिसांना स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही.
गेल्या महिनाभरपासून निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी ही पोलिसांवर असते. १८ – १८ तास या काळात कर्तव्य बजवावे लागते. खान-पान विसरून कर्तव्य बजावत अनेक वेळा राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खाकीचा धाक दाखवावा लागतो तर कधी समजावून सांगावे लागते. निवडणुकीच्या या धामधुमीत शिपाया पासुन तर अधिकारी वर्गावर मोठ्या प्रमाणात प्रेशर असते. वेळो वेळी वरिष्ठांना रिपोर्टिंग करणे या काळात महत्वाचे असते. अश्या वेळी जेवण मिळेल, चहा की नाश्ता असा कुठलाही विचार न करता हा खाकी वर्दीतला माणुस आपले कर्तव्य बजावत असतो.