ताज्या बातम्या

खाचणे येथे शेताच्या बांधावरून हाणामारी ! २ जण जखमी ; ४ जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी-विनायक पाटील

चोपडा – तालुक्यातील खाचने गावात माझ्या शेतातून ट्यूबवेलची केबल का नेतो असा जाब विचारल्याच्या कारणावरून बापलेकास चौघांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.पोलिसात चारजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून दुसऱ्या गटानेही तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, खाचणे येथील भिका यशवंत पाटील यांच्या शेताचा बांध दत्तात्रय पांडुरंग पाटील यांनी फोडून टाकला त्यामुळे बांध का फोडला आणि माझ्या शेतातून टुबवेल ची इलिगल टाकलेली केबल काढून घे असे शेतमालकाने सांगितले असता किरकोळ भांडणाचा राग मनात ठेवून भिका पाटील हे गुरांना चारा टाकण्यासाठी गल्लीतून जात असतांना त्यांना रस्त्यात अडऊन दत्तात्रय पांडुरंग पाटील , प्रवीण पांडुरंग पाटील (आर्मी) , रोहित दत्तात्रय पाटील सरपंच रामबाई पांडुरंग पाटील चौघांनी लोखंडी ट्यामी व काठ्यांनी मारहाण केली त्यात ते जबर जखमी झाले . भांडणं ऐकून भिका पाटील यांचा मुलगा दिनेश हा आवरा आवर करायला आला असता रोहित दत्तात्रय पाटील याने त्याच्या डोक्यात लोखंडी ट्यामी मारून खाली पाडले नंतर प्रवीण पाटील याने दिनेश च्या डाव्या पायाच्या मांडीवर जोराने चावा घेतला घेऊन जबर जखमी केले.जखमींवर चोपडा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत भिका पाटील यांच्या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलीसात भादंवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान दुसऱ्या गटानेही तक्रार दिली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *