खासदार उन्मेष पाटील यांना धरणगाव शहरातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचे निवेदन
धरणगाव – शहरातील शहरास लागून असलेल्या व बांभोरी बु. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वस्त्यांमधील नागरिकांना विविध समस्या भेडसावत असतांना नागरिकांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. नागरिक लाईट, रस्ते, गटारी, पाणी अश्या मुलभूत सोयी – सुविधांपासून देखील वंचित आहेत. अश्या परिस्थितीत नागरिकांना या ठिकाणी रहावे लागत असल्याने परिसरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आज रोजी खासदार उन्मेष पाटील यांना समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. ते धरणगाव शहरातील बालकवी ठोंबरे विद्यालयात एका कार्यक्रमानिमित्त आले होते.
त्या प्रसंगी खासदार पाटील निवेदानावरील हस्ताक्षर पाहून हस्ताक्षराचे कौतुक करीत. तुमचा परिसर देखील या प्रमाणेचा सुंदर करू असे आश्वासन देवून त्या साठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असे म्हटले.
निवेदन देण्यासाठी श्री सुधाकर मोरे, श्री विनायक कांयदे, श्री सुरेंद्र पाटील, श्री सुशिल भालेराव, श्री महेंद्र सैनी, श्री प्रशांत सुर्यवंशी, श्री पीं डी पाटील, श्री जगदीश पवार,श्री बाळू अत्तरदे, श्री संजय मिस्तरी, श्री बबलू पवार, श्री राजेंद्र चौधरी, श्री नितीन मराठे, श्री उध्दव मोरे, श्री गुलाब भोई, श्री रमेश महाराज आदी रहिवासी उपस्थित होते.