ताज्या बातम्या

खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने “आषाढी एकादशी” निमित्त भुसावळ येथून पंढरपूरसाठी मोफत विशेष रेल्वे गाडी

जळगाव उमेश कोळी

जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी मध्य रेल्वे तर्फे पंढरपूर वारीसाठी अनआरक्षित “मोफत विशेष आषाढी” रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी रावेर लोकसभेच्या खा. रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांचेकडे केली असता, त्यांनी दि.२८ जून रोजी दु.१.३० वा. भुसावळ स्टेशन येथून रेल्वेगाडी सुटून दि.२९ जून रोजी पहाटे ३.३० वा. पंढरपूर येथे पोहचणार आहे, तर त्याच दिवशी रात्री १०.३० वा. परतीसाठी निघणार असून, दि.३० जून रोजी दि.१.३० भुसावळ येथे पोहचणार आहे याबाबत माहिती दिली.जळगांव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी सन २०१४ सालापासून खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने सदर भुसावळ – पंढरपूर – भुसावळ “विशेष आषाढी रेल्वे” सोडण्यात येत असुन याला परिसरातील असंख्य वारकरी भाविकांना लाभ होत आहे. सदर रेल्वेत त्यांच्यामार्फत नाश्ता, जेवण, फराळ व पाण्याची स्वखर्चाने व्यवस्था करण्यात येते. कोविड-१९ महामारीमुळे सदर रेल्वे गाडी दोन वर्ष बंद करण्यात आली होती, त्यामुळे परिसरातील अनेक वारकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांना विठूरायाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र मागील खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने सदर गाडी पुन्हा चालू झाली होती आणि यावर्षी सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने व विठ्ठलाच्या कृपेने वारकऱ्यांना सदर रेल्वेद्वारे मोफत पंढरपूर वारी घडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *