खा.रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पुरविणे बाबत केल्या सूचना
जळगाव उमेश कोळी
आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यलय येथे भेट दिली असता खा. रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा श्री. भाग्यश्री विसपुते यांच्याशी संवाद साधून, रावेर लोकसभा क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदत पुरविणे तसेच पिक विमा ई. विषयांवर चर्चा करून सूचना केल्या.बुलडाणा जिल्ह्यात दि.१८ व १९ जुलै रोजी पाऊसाची झडी लागून अतिवृष्टीमुळे रावेर लोकसभा क्षेत्रात शेतीचे मोठे नुकसान झाले होते, अक्षरक्षा शेतातील माती वाहून गेली आहे. सदर शेतकऱ्यांना रोजगार हमी अंतर्गत शेतात गाळ टाकणे, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अतिवृतीने बाधित नागरिक व गावांना मुलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणे, तसेच पिक विमा मिळत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोहीम राबविणे बाबत खा. रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. तसेच अतिवृतीने बाधित नागरिकांना मदत पुरविनेसाठी १५ दिवसात बैठक लावून संबंधितांना योग्यत्या सूचना करणे बाबत सांगितले.