जळगांव जिल्हा
गणपूर प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी-विनायक पाटील
जळगांव – चोपड्यातील गणपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भूषण भिल होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे 40 स्टॉल मांडले होते.त्यातून सुमारे सहा हजार रुपयांच्या विक्रीतून विद्यार्थ्यांनी व्यवहाराचे धडे घेतले. यावेळी ऍड.बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मेळाव्याला उप सरपंच बाबुराव पाटील,संजय पाटील,दीपक पाटील,सुनील पाटील,भय्या पाटील, अजित पाटील,राजेंद्र पारे, किशोर पाटील,रमेश पाटील,लुधा पावरा, शुभांगी भोईटे, नीता शिंपी,वृषाली पाटील,संगीता पवार ,शाळा व्यवस्थापन समिती व विविध संस्थांचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते.