ताज्या बातम्या

गांजाची तस्करी करणाऱ्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी-विनायक पाटील

आज दि. 02/10/2023 रोजी 12.30 वाजता इसम नामे 1) टेट्या झगड्या बारेला वय 20 वर्षे रा डुकल्यापाणी ता वरला, जि बडवाणी (म. प्र). 2) बिलरसिंग दगड्या पावरा वय 22 रा. खा-यापाडा ता. चोपडा, 3) मिथुन दगड्या पावरा वय 19 रा. खाऱ्यापाडा ता. चोपडा यांनी स्वताचे आर्थिक फायदयाकरीता आपल्या ताब्यात १,७७,७४४/- रुपये किंमतीचा गांजा (दोन मोटार सायकलसह) हा विक्री करण्याचे उददेशाने मोटार सायकल वर वाहतुक करीत असतांना लासुर ते सत्रासेन रोडवर नोटेश्वर मंदीराजवळ मिळुन आले म्हणुन त्यांचे विरुध्द पोहेकॉ / २५३ भरत रामजी नाईक नेमणुक चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन यांनी दिले फिर्याद वरुन चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन सी सी टी एन एस गु र नं १७५/२०२३, गुंगीकारक पदार्थाचे अधिनियम 1985 चे कलम 20(ब) व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा. पोलीस निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर यांचे मार्गदर्शनानुसार पुढील तपास सपोनि शेषराव लक्ष्मण नितनवरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *