जळगांव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

जळगाव दि. 8 (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी क्रांती दिनी “भारत से जुडो” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी मुख्य भाषण करतील त्यांच्यासह ज्येष्ठ गांधीजन व सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष व अशोक जैन व डीन प्रा. गीता धर्मपाल उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधींनी इंग्रजांना “भारत छोडो… चले जाव”चा नारा ९ ऑगस्ट १९४२ रोजी दिला होता. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना “भारत से जुडो”ची आवश्यकता आहे. जैन हिल्सच्या गांधीतीर्थमधील कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

गांधी तीर्थच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बातमी सोबत पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत लिंक देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *