ताज्या बातम्या
गावठी कट्टा बाळगणाऱ्या 23 वर्षीय युवकास चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली अटक
प्रतिनिधी विनायक पाटील
दि 13 रोजी दुफारी चार वाजेचा सुमारास चोपडा तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्व मंदिराचा पुढे लासुर गावचे हद्दीत आरोपी आकाश गोरखनाथ सोनवणे वय २३ रा रिधुर ता.जि. जळगांव याने त्याचे ताब्यातील मो.सा. ने त्याचे ताब्यात 01 गावठी अग्नीशस्व कट्टा (पिस्टल हे प्राणघातक अग्नीशस्त्र असल्याचे माहीत असताना सुद्धा विनापरवाना गैरकायदेशीर आपले कब्जात बाळगुन त्याचे स्वताचे आर्थीक फायदाकरीता त्याचे ताब्यातील हिरो स्पेल्डर मो.सा.क्र GJ 05 LT1601 नेवाहतुक करीत असताना मिळून आल्याने बाबत पोका साहेबराव एकनाथ पाटील यांचा फिर्यादीवरून शस्त्र अधिनियम कलम ३/२५,७/२५ प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि शेषराव नितनवरे करत आहे.