गावठी बनावटीचे कट्टे बाळगणारे तीन आरोपी जेरबंद ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई
चोपडा / प्रतिनिधी – विनायक पाटील
साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त…
दिनांक 23/02/2024 रोजी रात्री 02.00 वाजता पोलीस निरीक्षक सो कावेरी कमलाकर यांना ए गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची एरटीगा गाडी क्रमांक MH . 12.RF.14 या गाडीत तीन इसम गावठी कट्टे (पिस्टल) घेवुन निघाले आहेत असे समजल्यावरुन रात्रगस्त चे पोलीस शशीकांत पारधी, चालक किरण आसाराम धनगर ,श्रावण तेली, संजय चौधरी यांनी बुधगाव फाटा जवळ थांबुन थोळ्याच वेळात सदर गाडी आल्याने गाडी थांबवुन त्यांची गाडीची झडती घेता सदर गाडीत 3 गावठी कट्टे व 8 जिवंत राऊंड विना परवाना मिळुन आल्याने इसम नामे जफर रहिम शेख वय वर्ष रा. भाजीबाजार घोड नदी शिरुर ता. शिरुर जि.पुणे 2) तरबेज ताहिर शेख वय 29 वर्ष रा. सेंटर दवाखाना सम रिव्हेनी कॉलनी शिरुर ता. शिरुर जि.पुणे 3) कलिम अब्दुल रहमान सैय्यद वय 34 वर्ष यांचे वर चोपडा ग्रामीण पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व वर तिन्ही आरोपी यांना अटक करण्यात आले आहे.