गुलाबराव पाटलांना टपरीवर बसवायचं की जेलमध्ये ? फाईल तयार आहे : संजय राऊत
धरणगाव : “वादळ, पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं? व्यवस्थित अभ्यास करून फाईल तयार केलेली आहे. ज्या ईडीला घाबरून तुम्ही तिकडे पळाले, असं सांगतात. तीच इडी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही”, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते धरणगाव मध्ये बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेलमध्ये टाकण्याचा इशाराही संजय राऊत यांनी जाहीर भाषणातून दिला.
जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत – संजय राऊत म्हणाले, इडीची फाईल बंद होत नाही, ती टेबलावरून कपाटात जाते. आमचं सरकार आलं अनेक फाईली कपाटातून टेबलावर येणार आहेत. जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत. या गुलाबरावांना आता त्या गुलाबरावांसाठी डबा घेऊन जावे लागेल. जळगाव जिल्ह्यात गद्दारीचे अडीचशे कोटी आले. यांना कोणी शाखाप्रमुख केलं नसतं. मातीतून उचलून शिवसेनेने मोठे केलं. मात्र हे शिवसेने सोबत बेईमान झाले. पाणी खात्याचे मंत्री आपल्या मतदारसंघांमध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी देऊ शकत नाही. त्यांना मिळणारे संध्याकाळचे पाणी कोणत्या ठिकाणाहून येतं ते टक्केवारीचे पाणी आहे म्हणतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त – पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्या जागा शिवसेनेच्या होत्या त्या आपण लढायलाच हव्या आणि जिंकायला हव्या. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केलेला नाही. शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या चरणी गहाण टाकला आहे. तुम्हाला मंत्री म्हणून रोजगार मिळाला. तुमच्याकडे पाणी खात आहे, पाण्यासारखा पैसा आहे. डांबर, माती, वाळू अशा सर्व ठिकाणाहून तुम्ही पैसे खात आहात, असा आरोप संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केला.
लोकसभेचा निकाल काय लागला ते विसरून जा. या जिल्ह्यामध्ये लोकसभेत भाजपचे जवळपास दोन लाख मतं कमी करण्याचे काम आपण केलं आहे. ज्या जळगाव जिल्ह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या जागा शिवसेना जिंकणार, असंही राऊत म्हणाले. यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ही जोरदार टोलेबाजी करत 20 वर्षांच्या लेखा जोखा मांडला गेले 20 वर्ष पंढरपूरला विठोबा नाही होता का–? भजनी मंडळ मोतीबिंदू चे गरीबविद्यार्थ्यांना साहित्य का दिले नाही यावेळी च का हे सर्व आठवत आहे जनता आशा भूलथापांना थारा देणार नाही जळगांव ग्रामीण मतदारसंघ वाट बघत आहे मतदानाची गद्दारील उत्तर देण्यासाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याचा पाठीशी शिवसैनिक म्हणून खंबीरपणे उभे राहू असे अशवस्त केले यावेळी उद्योजक सुरेश नाना चौधरी यांनी शिवसेना शी झालेली गद्दारी उद्धव साहेबांनी वर्षा जेव्हा खाली केलं मुख्यमंत्री पदावरून उतरवलं अस कपट कारस्थान केलं तेव्हा डोळ्यात अश्रू अनावर आले , राऊत साहेब तुमचा जसे ईडी लावले चौकशी केली तरी तुम्ही पण घाबरले नाही पुरून उरले असे लढढवे एकनिष्ठ शिवसैनि क आहेत आम्हाला पण त्रास देण्यात येत आहे पण आम्ही शिवसैनिक लढा देऊ जळगांव ग्रामीण वर भगवा फडकू अस मत व्यक्त केले.
मा नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा ला गद्दारी नवीन नाही परंतु शिवसैनिक एकनिष्ठ राहून विकला गेला नाही राऊत साहेब तुम्हाचा दौरा आम्हा शिवसैनिक ला पावर हाऊस ठरेल या मतदारसंघात विद्यामानांनी विकासा चा बठ्याबोळ केला तरूण वर्ग ला रोजगार नाही जे आई समान शिवसेना ला उद्धव साहेबाना नि एवढ देऊन झाले नाही ते जनतेला काय होतील आम्ही युवसैनिकानि चंग बांधला असून विरोधकाला चारीमुढ्या चित केल्याशिवाय शांत बसणार नाही
लकी आण्णा यांनी आपल्या मनोगतात शिवसैनिक मतदान पेटीतून मशाल तेज काय असते हे मतदानारूपी आशीर्वाद देवून जळगाव ग्रामीण विधानसभा शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे चा विचाराचं आमदार विधानसभेत पाठवणार.
व्यासपीठावर उपस्थित शिवसेना जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे , डॉ हर्षल माने , महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील जळगांव ता प्रमुख उमेश पाटील धरणगाव ता प्रमुख जयदीप पाटील, सह शिवसेना युवासेना चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.