ताज्या बातम्या

गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक ; अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात घेतली भेट

प्रतिनिधी अजय बाविस्कर

जळगाव आसोदा येथे शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संवेदनशील आणि सेवाभावी स्वभावाचे आणखी एक उदाहरण दाखवले आहे.असोदा येथील माजी उपसरपंच सुभाष पोपटराव माळी यांचा जळगावहून आसोदा गावाला जात असताना रात्री अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला तत्काळ विराम दिला आणि अत्यंत तातडीने जळगाव येथील आयकॉन हॉस्पिटल गाठले, जिथे सुभाष माळी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सुभाष माळी यांच्या प्रकृतीची त्यांनी असते आस्थेवाईक पणे चौकशी करून माळी यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले की, सुभाष माळी यांना उत्तम उपचार मिळतील आणि त्यांची तब्येत लवकरच सुधारेल. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.आम्ही एक कुटुंब आहोत, कोणत्याही संकटात एकमेकांना आधार देणे हेच आपले कर्तव्य आहे,असे सांगून गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांचे हृदय जिंकले. त्यांच्या या कृतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेत पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल अधिकच प्रेम आणि आदर निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या मनःस्पर्शी कृतीने आसोदा करांच्या मनात त्यांच्या नेत्याबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. त्यांच्या माणुसकीच्या भावनेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ते केवळ एक राजकीय नेते नसून, एक खरे लोकनेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत जितेंद्र गवळी ,दिपक माळी, विशाल निकम , तुषार महाजन, अजय महाजन,. महानगर प्रमुख संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *