गेल्या २६ वर्षापासुन अविरत रुग्न सेवा देणारे डॉ.विनोद कुमार बिराजदार

जिवनज्योत हॉस्पिटलला येणारा प्रत्येक रुग्ण आमच्यासाठी सर्वस्व : डॉ.विनोदकुमार बिराजदार
डॉ.विनोद कुमार बिराजदार यांनी तांबरवाडी, राजेवाडी या गावातुन बालपण व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात कुठलाही शैक्षणीक वारसा नसताना आपल्या आई वडीलांचे स्वप्न मनाशी बाळगुन अहोराञ अभ्यास करत डॉक्टर होत, बी.एच., एम.एस., सी.सी.एम, पी.जी. पदवी घेउन लामजना पाटी येथे जिवनज्योत हॉस्पिटलच्या माध्यतुन गेल्या २६ वर्षापासुन अविरत सेवा देत आहेत. लामजना व परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी प्रतिवर्ष जिवन ज्योत हाॅस्पीटल येथे मोफत रक्तदान शिबीर, सर्वरोगनिदान शिबीरसह अनेक नामांकीत व तज्ञ डाॅकटरांच्या भेटी होणारे लामजना पाटी येथील एकमेव जिवनज्योत हाॅस्पीटल आहे.
डाॅ विनोदकुमार बिराजदार व सौ संगीता बिराजदार हे दांम्पत्य एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असुन, मोठं होण्याचं स्वप्न पाहणारे आई-वडील आणि त्या स्वप्नासाठी झटणारा एक जिद्दी तरुण डाॅ विनोदकुमार बिराजदार | तांबरवाडी, राजेवाडी या छोट्याशा गावात जन्मलेला एक शेतकरीपुत्र, ज्याच्या घरात ना शिक्षणाची परंपरा, ना कुटलाही शिक्षणाचा वारसा, ना मोठे आर्थिक पाठबळ, पण आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न डोळ्यासमोर ठेवत डाॅ बिराजदार यांनी आयुष्याचा एकच ध्यास घेतला “डॉक्टर बनून गरजू लोकांची सेवा करण्याचा!”
अहोरात्र मेहनत, न झोपणाऱ्या रात्री, हातात पुस्तकं आणि मनात एकच ध्येय कसलीही तक्रार न करता, संघर्षाला न घाबरता B.H.M.S, C.C.M, P.G पदव्या त्यांनी मिळवल्या आणि डॉक्टर म्हणून उभं राहण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं.
जीवनज्योत हॉस्पिटल’ –हे गरीबांचा दवाखाना !
आज लामजना पाटी येथील ‘जीवनज्योत हॉस्पिटल’ हा एक विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या २६ वर्षांपासून या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे. “रुग्ण हा देव आहे” या भावनेने डॉ. विनोदकुमार बिराजदार दिवसरात्र रुग्ण सेवा केली अन शुन्यातुनही विश्व निर्मान करता याच ज्वलंत उदाहरण डाॅ बिराजदार दांम्पत्य आसल्याच परीसरात बोलल जातय. कधीही आई-बाबांच्या डोळ्यातलं पाणी आणि अभिमानाचं समाधान – हेच खऱ्या यशाचं प्रमाणपत्र ! आज ते डॉक्टर आहेत, पण अजूनही त्यांनी स्वतःला कधीही ‘मोठं मानलं नाही. डाॅ विनोदकुमार बिराजदार यांनी अनेक रुग्णांना कीतीही मोठा आजार असला तरीही एक आपुलकी व आधार देण्याच काम केल आहे. आजही डाॅ विनोद बिराजदार व डाॅ संगिता बिराजदार हे रुग्णांसाठी अहोराञ रुग्णसेवा देतात. कोरोना काळात तर डॉक्टर बिराजदार दांपत्यांनी जीवाची बाजी लावून प्रत्येक रुग्नाला आधार देण्याचं काम केलं व एका देवताप्रमाणे बिराजदार दांपत्यांनी कोरोना काळातही न थांबता व आपल्या जीवाची न परवा करता आपली रुग्ण सेवा दिली. आतापर्यंत बिराजदार दांपत्यांनी गेल्या 26 वर्षाच्या कार्यकाळात पाच ते सात लाख रुग्ण तपासणी केली असून यापुढेही ग्रामीण भागातील नावाजलेलं जीवन ज्योत हॉस्पिटल च्या माध्यमातून डॉक्टर विनोद कुमार बिराजदार व डॉक्टर संगीता बिराजदार यांच्या हातून अशीच रुग्ण सेवा घडो.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सदभावनेतुन समाजासाठी, रुग्णांसाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करणाऱ्या या ‘रुग्णसेवेच्या देवदूताला’ मानाचा मुजरा !