ताज्या बातम्या

गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा गुन्हा एलसीबी पथकाकडून उघड

प्रतिनिधी : आमीन पिंजारी

कजगाव – तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या गोडगाव येथे आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका नराधमाने अत्याचार करीत गोठ्यात मृत्यू देह टाकल्याची घटना उघडी झाली होती या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यम राजकुमार पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आनणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसान नजन पाटील यांना आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी पोलीस निलेश राजपूत पोउपनिरी गणेश वाघमारे , गणेश चौभे विजयसीग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रीतम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरीश परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर ,दर्शन ढाकणे, यांचे पथक तयार करण्यात आले होते, त्यावरून नमूद पथकाने शोध सुरू केला असता दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी अल्पवयीन पीडित मुलगी हिचे मृतदेह हे भडगाव पो , स्टे, हद्दीत आरोपीच्या खेळयातील कुटीच्या डिगा जवळ चप्पल मिळून आली , त्यावर कुट्टीचे डिग उपसून पाहिले असता अल्पवयीन मुलीचे प्रेत मिळून आले, त्यानंतर तपासात खळयाचे मालक यांची व त्यांचे कुटुंबाची चौकशी करीत असताना खळयाचे मालकाचा मुलगा स्वप्निल पाटील उर्फ सोन्या वय 19 तालुका भडगाव जिल्हा जळगाव याच्यावर जास्त संशय बाळवल्याने त्यास वरील पथकाने ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अधिक तपासाकामी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील व त्यांचे पथक हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *