ताज्या बातम्या

गोल्ड व्हॅली दापोलीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत ! संगीत खुर्चीत माय – लेक ठरल्या विजेत्या

दापोली : गोल्ड व्हॅली दापोलीत 2023 या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही नववर्षाच्या स्वागतार्ह 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 1 या दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी क्रिकेट व बॅडमिंटन या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर रात्री संगीत खुर्ची,बादलीत चेंडू टाकणे,फुगे फोडणे,निंबू चमचा,बेडूक उड्या इत्यादी मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.निंबू चमचा स्पर्धेच्या लहान गटात परी पावरा ही विजेता ठरली तर मोठ्या गटात क्षितिजा कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.संगित खुर्ची स्पर्धेच्या लहान गटात प्रियंका भिसे ही मुलगी विजेता ठरली तर मोठ्या गटात सौ. प्रितम भिसे ह्या विजेता ठरल्या. स्पर्धेत विजेत्यांना सौ.स्वप्नाली प्रभू यांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. गायन स्पर्धेत सुशिलकुमार पावरा यांनी खेळ रंगला हे भावगीत व माॅ ओ मेरी माॅ हे फिल्मी गीत सादर केले तर क्षितिजा कांबळे हिने दोन भावगीत आपल्या मधून आवाजात गायन केले.परी पावराने मुकाबला व भाई बहन का बंधन हे रक्षाबंधन पर गीतवर सुंदर नृत्य सादर केले.मायरा दळवी हिने लेजा लेजा या गाण्यावर सामूहिक नृत्य सादर केले.तिला परी पावरा व ईशा झगडेनी नृत्यात साथ दिली.ईशा झगडे या बालकीने इंग्लिश डान्स सादर केला.हॅरी पावराने जी हुजूर गाण्यावर दमदार नृत्य सादर केले.स्पर्धेतील इशा झगडे ,समीक्षा महाडिक, प्रियंका भिसे,क्षितिजा कांबळे, परी पावरा,मायरा दळवी व हॅरी पावरा या विजेत्यांना आकर्षक वस्तूरूप बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमात भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत, फिल्मी गीत इत्यादी गायन तसेच वैयक्तिक व सामूहिक नृत्य गोल्ड व्हॅलीतील कलाकार यांनी सादर केले. शेवटी रात्री 12 वाजल्यानंतर नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व गोल्ड व्हॅलीतील बांधवांनी एकमेकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश झगडे,बापूसाहेब भिसे,सुशिलकुमार पावरा,दत्तप्रसाद वैशंपायन, सौ. प्रितम भिसे,सौ.पिंगला पावरा ,सौ.अर्चना दळवी,सौ.पुजा कांबळे,सौ.स्वप्नाली प्रभू,प्राची वैशंपायन व क्षितिजा कांबळे,समीक्षा महाडिक, प्रिती भिसे,मायरा दळवी,परी पावरा,हॅरी पावरा,इशा झगडे इत्यादी बालकलाकार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक भिसे, दक्षता साळवी,शिल्पा पाटोळे,कृष्णराज राठोड, युवराज ठाकूर, पुर्मीला तोंडकर, दत्तप्रसाद वैशंपायन, राजेश झगडे,सुशिलकुमार पावरा,यशवंत कांबळे,महेश्वर वाघ,अजेय कर्णिक, रश्मी जोशी,अपर्णा मोरे,एस एस प्रभू,कौशल सोलंकी,डाॅ.रूपेश दळवी इत्यादी गोल्ड व्हॅलीतील बांधवांनी सहयोग केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिलकुमार पावरा यांनी केले तर आभारप्रदर्शन राजेश झगडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *