ताज्या बातम्या

ग.स.संस्थेतर्फे मयत सभासदाच्या वारसास विमा धनादेश प्रदान

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा : तालुक्यातील धानोरा येथील झि.तो.महाजन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक व ग.स. संस्था शाखा चोपडा नं.२ येथील सभासद कै.अरुण सुकलाल पाटील यांचे अपघाती निधन झालेने त्यांच्या वारस पत्नी श्रीमती जयश्री अरुण पाटील यांना ग स.संस्थेतर्फे संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन सभासद जनता अपघात विम्याचा रक्कम रू.तीन लाखाचा धनादेश माजी मुख्याध्यापक किशोर महाजनसर, शाखाधिकारी श्रीमती स्मिता मोरे यांचेहस्ते देण्यात आला. याकामी स्थानिक संचालक मंगेश भोईटे व योगेश सनेर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष उदय मधुकर पाटील यांचे कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ग.स.संचालक तथा कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष योगेश सनेर, चोतामाचे माजी चेअरमन व्ही.पी.चौधरी, विद्यमान चेअरमन दिनेश बाविस्कर, राजेश चौधरी, शिक्षकेतर संघटनेचे कैलास महाजन, अरुण पाटील, कलाध्यापक संघटनेचे पंजाबराव बाविस्कर, बोरअजंटीचे उपशिक्षक रविंद्र नेरकर, आरोग्य विस्तार अधिकारी सुशिल सोनवणे, शाखाधिकारी माधवराव सोनवणे, उपशाखाधिकारी शरद पाटील यांचेसह कर्मचारी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *