घरकुलचे चेक देण्याकरता पंचायत समिती अभियंत्याने मागितले पैसे घरकुल लाभार्थ्यांची तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना तक्रार
प्रतिनिधी विनायक पाटील
न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा
चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील सतिष बिरसिंग पाटील यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2019 मधे घरकुल मंजुर झालेले आहे. सदर घरकुल लेंटर लेव्हल पर्यंत बांधकाम पुर्ण केलेले आहे.आजपावेतो दोन हप्ते टाकण्यात आलेले आहे. त्या पैकी पहिला हप्ता रु.१५०००/- तर दुसरा रु.४५,०००/- रकमेचा असे टाकण्यात आलेले आहे. मी सदर बांधकाम लिंटल लेव्हल पर्यंत केल्यावर संबंधीत गृहनिर्माण अभियंता चेतन कुमावत यांना घरकुलाचा ऑनलाईन फोटो काढुन तिसरा हप्ता टाकणे कामी जवळपास१महिन्यापासुन विनंती करत आहे. तरी सदर नमुद अभियंता याने मला सांगितले की, मी तुझ्या भावाचे नामे विनोद बिरसिंग पाटील याचे घरकुलाचे हप्ते टाकुण दिले परंतु त्याने मला फक्त ४०० रुपये दिले आहे. त्याने बाकी मला ९०० रूपये दिले नाहीत. मला वरती सर्व अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात तेव्हाच हे पैसे पडतात असे सांगितले आहे. त्यानंतर मी परत दोन तीन दिवसांनी भेटलो असता त्याने मला संप चालु आहे असे सांगितले त्या नंतर मी माझ्या घरकुलाचा हार्ड कॉफी फोटो काढुन आपल्या पंचायत समितीत चंद्रकांत बडगुजर (घरकुल ऑपरेटर) यांचा कडे दिला. त्याने तो फोटो चेतन कुमावत यांच्याकडे परत पाठविला.त्यासाठी मी नागलवाडी येथील ग्रामसेवक यांच्याकडे तिसरी नजर पहाणी दाखला घेणे कामी गेलो असता त्यांनी मला सांगितले ते माझे काम नाही चेतन कुमावत यांना भेटा अश्या पद्धतीने हप्ता टाकण्यासाठी मानसिक व शारिरिक छळ केला जात आहे. तसेच घरकुल हप्ते टाकण्यासाठी व जिवो टॅगिंग करण्यासाठी गृह निर्माण अभियंता चेतन कुमावत याने पैश्याची मागणी केली.परंतु ती पुर्ण न केल्यामुळे तसेच माझ्या भावाने अपुर्ण पैसे दिल्याचे रागामुळे माझा हप्ता टाकला जात नाही व मला उडवा उडवीची उत्तर दिली जात आहे. महाशय मी आर्थिक दुर्बल घटकात असुन माझे एक प्रकारे आर्थिक व शारिरिक व मानसिक त्रास संबिधित सर्व कर्मचारी देत आहे.तसेच संबिधीत अभियंता तु कोणा मुळे मातला आहेस हे मी बघतोच तरी या संदर्भात महाशय आपण चौकशी करुन संबिधीतांन वर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच गावातील घरकुल धारकांनवर होणारा अन्याय व शोषण थांबविण्यात यावे या संदर्भातील कारवाई न झाल्यास मी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना तक्रारी अर्जाद्वारे देण्यात आलाआहे. 45 दिवसात घरकुल पूर्ण करण्याचा नियम आहे चंद्रकांत बडगुजरजेव्हा सतीश बिरसिंग पाटील हे संबंधित घरकुल चे कागदपत्र घेऊन घरकुल ऑपरेटर चंद्रकांत बडगुजर यांचा कडे घरकुल चा चेक चा विषय केला असता उपकरी भाषा करत 45 दिवसात घरकुल च काम करण्याचा नियम असल्याचे सांगितले( व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाराल) तरी सुध्दा आम्ही तुमचं काम करून देत असल्याचे सांगत अभियंता चेतन कुमावत यांना भेटायला सांगितले. जर 45 दिवसात घरकुल पूर्ण करायचा नियम आहे तर तालुक्यातील किती घरकुल वेळेचा आत पूर्ण झाले आहे ? पंचायत समिती घरकुल योजनेत नियमबाह्य काम कोणाचा सांगण्यावर व का ? करत आहे जर आर्थिक व्यवहार साठी अडवणूक होत नाही तर नियमबाह्य काम का पंचायत समिती कर्मचारी का करत आहे ? याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करतील का या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मी माझे काम प्रामाणिक पणे केले आहे : चेतन कुमावत
ह्या तक्रारी संधर्भात चेतन गृहनिर्माण अभियंता चेतन कुमावत यांचा प्रतिक्रया घेतली असता मी माझे काम प्रामाणिक पणे केले असून सतीश बिरसिंग पाटील यांना 2019 मध्ये घरकुल योजना मंजूर झाली असून या पूर्वी 2 चेक दिले गेले आहे. तिसऱ्या चेक साठी प्रक्रिया मी पूर्ण केली आहे.26 जून पासून पंचायत समिती कमचारी संपावर गेल्या मुळे त्यांचा तिसऱ्या चेक साठी विलंब होत आहे मी कोणा कडून पण पैश्याची मागणी केली नसल्याचे अभियंता चेतन कुमावत यांनी सांगितले.
सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत घरकुल योजनाच लाभ साठी विना घर बांधून पूर्ण चेक साठी 15000 ची मागणी करतात व तसे आमच्या गावात झालेलं आहे. चोपडा तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गरीब लोकांना हे लालची लोक खूप लुबाडून खात आहेत यांच्यावर कठोर कार्यवाही व शिक्षा झाली पाहिजे याच्या पुरावा मागितले तर एका क्षणात सापडेल