घरगुती किरकोळ वादातून सुनेने सासूला चाकूने मारहाण केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा येथील मोठा देव्हारा भागात राहणाऱ्या लताताई कृष्णा गिरी वय ५८ यांनी दिलेल्या फिर्यादीत दि ७जुलै रोजी दुफारी तीन वाजेचा सुमारास आरोपी सूनबाई सोनाली सागर बुवा रा. मोठादेव्हारा चोपडा व मुलगा सागर बुवा यांचात नवीन मोबाईल घेण्याकरता पैसे देणार नाही सध्या माझ्या कडे पैसे व मोबाईल नाही यावरुन त्यांच्यात शाब्दीक वाद सुरु असतांना फिर्यादी लताताई गिरी ही सूनबाईला समजवण्यास गेली असता त्याचे सूनबाईला संताप अनावर झाला व तिने घरातील कांदा कापण्याचा चाकु हातात घेवुन सासू लताताई गिरी यांचा अंगावर धावुन डाव्या डोळ्या खाली चाकुने मारहाण करुन दुखापत करुन सागर बुवा यास म्हणाली की तुम्ही जर तुमच्या आई वडीलांना घराच्या बाहेर काढले नाही तर मी फक्त डोळ्या खाली चाकु मारलेला आहे तुम्ही ड्युटीवर गेल्यावर मी त्यांचा पोटावर मारेल अशी धमकी दिल म्हणून सोनाली व त्याचे वडील आरोपी मनोज रावन पुरी रा.दादर नगर हवेली सेलवास चोपडा शहर पोलिस ठण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२),१३१,३५२, ३५१(२).३ (५) प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोना संदीप छगन भोई करत आहे.