गुन्हेगारी

घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे म्हणत विवाहितेचा छळ पतीसह सासू – सासरा व ३ दिरांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी नवीद अहेमद

वसमत : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी वय ३१, रा. ह.मु. फुलेनगर वसमत असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. काही दिवसापासून पतीसह देर सासू, सासऱ्यांनी तीचा छळ सुरू केला. मारहाण सुरू केली. यातच नवीन घर बांधण्यासाठी राणी ने माहेरहून पाच लाख रुपये आणावे अशी मागणी देखील वारंवार केली.

राणी ने माहेरहुन पैसे न आणल्यामुळे तीला आणखी जास्त त्रास देण्यास सुरूवात केली. 

फिर्यादी राणी हिस तू दिसायला सुंदर नाही तुला घरातील कामधंदा येत नाही म्हणत चरित्रावर संशय घेऊन लाथा भुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. माहेरून घर बांधण्यासाठी 5 लाख रूपये आणत नसल्याने फिर्यादी राणीचा सासरच्या लोकाकडून छळ करण्यात आला आहे. तर राणी च्य चरित्रावर संशय घेऊन , प्रचंड राग धरून सासरच्या लोकांनी प्रचंड छळ करत शिवीगाळ करून लाथा भुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १७ जुलै रोजी राणी भ्र राहुल मुळे याच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस स्टेशन येथे

 गु. र. न.व कलम २९८/२२ कलम ४९८(अ)३२३,५०४,५०६३४ भ.द.वी. आरोपी पती राहुल मधुकर मुळे, सासू शशिकला मधुकर मुळे, सासरा मधुकर जयराम मुळे, देर प्रशांत मधुकर मुळे, देर आनंद मधुकर मुळे, देर गुणवंत मधुकर मुळे, सर्व राहणार भीरडा तालुका हिंगोली व मावस सासू सुमित्रा गायकवाड राहणार पारोळा तालुका जिल्हा हिंगोली यांच्यावर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह शेख नय्यर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *