चहार्डी गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा या संदर्भात ग्राम विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीचे मागणी
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांना चहार्डी गावा संदर्भात आज जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानावर जाऊन चहार्डीगावा मध्ये सुरू असलेल्या आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण संदर्भात सविस्तर माहिती दिली.चोपडा तालुक्यातील 2नंबर लोकसंख्या असलेलं चहार्डी हे गाव आहे या गावांमध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही जसे की उतारे, दाखले,गावातील समस्या साफसफाई ,उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला असून तरीदेखील ग्रामसेवक. सरपंच.कोणीही कारवाई करीत नाही यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाही व दिव्यांग बंधू भगिनी यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत.व विविध प्रकाराच्या गावातील समस्या.याकरिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी यासंदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण गेल्या 09 ऑगस्ट पासून आजच्या दिवसापर्यंत सुरू आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधां करिता ग्रामस्थांना आंदोलन सुरू ठेवावे लागले तसेच चोपड्याचे सीईओ.व बीडीओ साहेबांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही यामुळे गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या करता जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी जिल्हा परिषद सीईओ साहेब यांची भेट घेऊन चहार्डी गावकऱ्यांची व्यथा मांडली आपण दोन दिवसात प्रत्यक्ष चहार्डी गावाला भेट दयावी व तेथील ग्रामस्थांची व्यथा ऐकून त्वरित पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्त करावे अन्यथा चहाडी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करण्यात यावे असे यावेळी जिल्हाध्यक्षांनी मागणी केली होती परंतु आतापर्यंत जळगाव जिल्हा परिषद चे मुख्य सीईओ साहेब यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आज महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री मा.श्री.गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन देऊन चहार्डी गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक दयावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळेस उपस्थित माजी जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर.मीडिया प्रमुख योगेश भोई.डॉ नारायण आटकोरे.पवन खंबायत.ओम प्रकाश अग्रवाल.मुकुंदा बराटे.भीमराव मोरे.आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.