ताज्या बातम्या

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची होऊ घातलेली निवडणूक हुकूमशाही पद्धतीने व बेकायदेशीरच : डॉ.विनोद कोतकर

चाळीसगाव – शतकोत्तर परंपरा असलेली चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूकच बेकायदेशीर आहे व हुकूमशाही पद्धतीने घेतली जात असल्याचा आरोप मा.सचिव डॉ.विनोद कोतकर, मा.अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, डॉ.सुनिल राजपूत यांनी केला आहे, पत्रकार परिषद घेत विविध पुरावे दाखवत एकाच कुटुंबांच्या दावणीला संस्था न बांधता सर्वसामान्य सभासदांनाही निवडणूक लढवता यावी, यासाठी २०१७ ची घटना दुरुस्ती करूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असेही सांगितले, कारण विद्यमान मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन १९९२ ची घटनेनुसारच निवडणूक घेत असून, १० सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या संस्थेचे १३ सप्टेंबरला ३ दिवसांत घाईघाईने धावपळ करत निवडणूक लावण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक संस्थेचे आज हयात सभासद ८४१४ असून ते १८ पैकी फक्त ८ च संचालक निवडून देऊ शकता, तर इतर विविध बेकायदेशीर कंपन्यांचे एकाच परिवारातील व जवळचे फक्त ६० सभासद उर्वरित १० संचालक निवडतात हे अनाकलनीयच आहे,व यामुळेच अग्रवाल कुटुंबाचेच बहूमत असते व ते इतर ८ मधील संचालक, अध्यक्ष, सचिव यांना विश्वासात न घेता बहुमताच्या जोरावर शिक्षक भरतीसह विविध ठराव करत असतात, २५ जुलै २०१८ च्या कार्यकारी मंडळाच्या सभेत त्यांनी २०१७ ची घटना दुरुस्ती करण्याचे व सभा घेण्याचे अधिकार सचिवांना असतानाही मा.संचालक अॕड.प्रदिप अहिरराव यांना २०१७ नुसार घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले,सदरिल सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लावण्याचा घाट घातला परंतु या ५ वर्षातही मागील प्रमाणेच घटना दुरुस्ती न करता हा मुद्दा रेटून नेला,याचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या मर्जीतलेच संचालक बिनविरोध करणे व त्या ६० सभासदांमधूंन १० जागा निवडून आणणे हे होय,२००३ पासुन जळगाव धर्मादाय आयुक्त कार्यालयात चेंजिंग रिपोर्ट पेंडिंग आहेत व संस्थेच्या सर्व मुळ कागदपत्रांवर जळगाव येथे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन म्हणून डॉ.वा.ग.पूर्णपात्रे व सचिव म्हणून श्री.व्ही.डी.जोशी यांचेच नावे आहेत, यावरुन हे सिद्ध होते की, २५ वर्षात २००३, २००९, २०१४, २०१७ अशा चार पंचवार्षिक निवडणुका होऊन आता ५ वी पंचवार्षिक निवडणूक लागली तरी या कुटुंबाने न चेंजिंग रिपोर्टसाठी पूर्तता केली न २०१७ च्या घटना दुरुस्तीसाठी आग्रह धरला, आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आधी घटना दुरुस्ती करण्यासाठी याचिका दाखल केली, त्यात कोर्टाने १८० दिवसांत घटना दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. परंतु तोपर्यंत निवडणूक झालेली असेल, म्हणून आधी घटना दुरुस्ती करावी मगच निवडणूक घ्यावी असा आमचा आग्रह होता, परंतु यांनी आपल्या मर्जीतलेच निवडणूक अधिकारींकडुन घाईघाईतच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा घाट घातला व मतदार यादीही दिलेल्या तारखांमध्ये प्रसिद्ध न करता उशिरा प्रसिद्ध करत निवडणूकीच्या अटी व शर्तींचा भंग केला असाही घणाघात केला तसेच प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनीही सदरिल लोकांनी ५ वर्षात अध्यक्ष,सचिव यांना विश्वासात न घेता शिक्षक भरतीसह विविध विषय बहुमताने पारित केलेत, मा.संचालक डॉ.सुनिल राजपूत यांनी सांगितले कि विश्वासात घेत नसल्यानेच आम्ही त्यांच्यापासून स्वाभिमानाने दूर झालो व प्रत्येकी १० हजार रु.सभासद फी भरुन धनदांडग्यांनाच सभासद करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला कारण जास्त पैसे देऊन एकाच परिवारातील व आपल्या मर्जीतलेच सभासद करण्यापेक्षा परिसरातील सर्वसामान्य नागरिक सभासद व्हावा असा त्यामागचा हेतू होता व शिक्षक भरतीसाठीही आपल्या परिसरातीलच गुणवत्ताधारक उमेदवार घेण्यासाठी आम्ही आग्रही असतांना यांनी बहुमताच्या जोरावर बाहेरील उमेदवारांनाच प्राधान्य दिले व मर्जीतील संचालकांनाच महाविद्यालय व इतर महत्त्वाचे चेअरमनपद दिले व मला दिलेल्या प्राथमिक विद्यालयात लहान मुलांसाठी गरज असतानाही संरक्षण भिंतीचे कामही मी वेळोवेळी पाठपुरावा करुनही यांनी ते पूर्ण केले नाही तसेच २०१७ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यात लाॅ काॅलेज,फार्मसी व इतर विविध अभ्यासक्रम सुरु करण्याचे सांगितले होते ते हवेत विरले असे सांगितले यावेळी मा.संचालक राजेंद्र चौधरी,सुधीर पाटील,के.बी.साळुंखे,महेंद्र पाटील,सुरेश चौधरी,वर्धमान धाडीवाल,भूषण ब्राह्मण कार,सुचित्रा राजपूत उपस्थित होते,यावेळी संस्थेच्या ८४१४ सभासदांमधूनच १८ ही संचालक निवडून यावेत यासाठी घटना दुरुस्ती आवश्यकच आहे कारण यातून सर्व सामान्य सभासदांना सर्व उमेदवारांना लोकशाही पद्धतीने मतदान करता येईल असा पुनःरोच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *