ताज्या बातम्या

चोपडा उपजिल्हा रुग्णालयातुन सिझर सांगून जळगाव येथे रेफर करण्याची डॉक्टरांची खोटी मानसिकता

प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधाचा अभाव आहे. काही डॉक्टराच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनता त्रासा पासून त्रस्त झाली आहे.येथिल उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर असून सुद्धा त्यांचे खाजगी दवाखान्यात जास्त लक्ष असते असा आरोप सामान्य नागरिक करताना दिसतात. चारपाच दिवसांपूर्वी माचला या गावाची रिंगू बारेला ही आदिवासी महिला बाळपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चंद्रहार पाटील यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले दोन दिवसानंतर तिला सांगण्यात आले की, तुझी डिलिव्हरीला ८ ते १० दिवस वेळ आहे असे सांगून घरी पाठवून दिले. तद्नंतर दुसऱ्या दिवशीच ती महिलेचे पोटात वेदना व्हायला लागल्यामुळे परत उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली तर दिवस भर उपचारासाठी राहिल्या नंतर रात्री जळपास 9 ते 10 वाजे दरम्यान तिच्या नातेवाईकाना सांगण्यात आले की, ह्या महिलेला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवावे लागेल.आणि त्यातल्या त्यात रुग्णवाहिका वाल्याचा संप सुरू रात्रीच्या वेळेस आदिवासी कुटुंब कुठे जाणार त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम ह्यांना बोलवुन संपूर्ण हकीकत सांगितली त्यावर रात्री सिझर करत नाही याबाबत मला लेखी दया व ती सकाळ पासून तुमच्या कडे ऍडमिट असताना तूम्ही तिला रक्ताची आवश्यकता असे का सांगितले नाही आणि इतक्या रात्री तुम्ही तिला जळगाव पाठवत आहे या सर्व बाबीचे मला लेखी दया आणि रिंगू बारेला या महिलेला उपजिल्हा रुग्णालयातुन डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटला ऍडमिट केले असता अवघ्या १० ते १५ मिनिटांत तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर खाजगी रुग्णालयात नॉर्मल आणि सरकारीत सिझर हे आश्चर्य होय असे अनेकांनाकडून बोलले जात आहे.याचा अर्थ सरकारी कामाची जबाबदारी अंगावर न घेता काम झटकून मोकळे राहणे होय.

स्त्रीरोग तज्ञ डॉक्टराच्या विरोधात व उपजिल्हा रुग्णालयाच्या असविधान बाबत मी स्वतः वैयक्तिक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम यांनी बोलताना सांगितले – नितीन निकम ( सामाजिक कार्यकर्ते)

रिंकू बारेला यांना डिलिव्हरी साठी माझ्याकडे ऍडमिट केल्यानंतर रक्तपुरवठ्याची मला तरी आवश्यकता वाटली नाही तसेच अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात नॉर्मल डिलिव्हरी तिची झाली उपजिल्हा रुग्णालयातील सुख सुविधा कमी पडत असल्याने ग्रामीण भागातील लोकांचे अतोनात आलो होत आहेत तसेच इमर्जन्सी मध्ये उपजिल्हा रुग्णालयाला एक तरी रुग्णवाहिका आवश्यक आहे तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील सुख सुविधांच्या बाबतीत नक्कीच विचार करीन – डॉ.चंद्रकांत बारेला (जनसेवा हॉस्पिटल)

सर्व डॉक्टर ड्यूटी वर वेळेवर येतात असतात आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ.चंद्रहार पाटील यांनी त्या महिलेची स्थिती पाहून सांगितली असेल.अशी घटना एखाद होत असते की येथे सिझर आणि तिथे नॉर्मल डिलिव्हरी होणे याबाबत मी सविस्तर चर्चा चंद्रहार पाटीलाशी करेल – डॉ.सागर पाटील ( प्रभारी इन्चार्ज उपजिल्हा रुग्णालय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *