चोपडा एस.टि.आगारास सर्वेक्षण समितीची भेट

प्रतिनिधी : विनायक पाटील
राज्यभर राज्य परीवहन महामंडळा कडुन राबविण्यात येत असलेल्या “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत चोपडा बसस्थानकातील स्वच्छता व बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणा-या विकासाभिमुख उपक्रमांची माहिती मूल्यांकन समितीने घेतली. धुळे येथील विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय कर्म.वर्ग अधिकारी प्रविण पाटील, विभागीय सांख्यिकी अधिकारी सुरज माळी,विभागीय वाहतूक अधीक्षक वासुदेव देवराज यांच्या संयुक्त समितीने नुकतीच चोपडा आगारास भेट देवुन संपुर्ण बसस्थानक,आगाराची पाहणी करून सर्वेक्षण केले. चोपडा आगाराचे बदलेले रुप, स्वच्छता,नीटनेटकेपणा,व आगारात झालेला आमुलाग्र बदल पाहुन “अप्रतिम बसस्थानक” असे गौरव उदगार काढुन यासाठी मेहनत घेणाऱ्या आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या सह चालक/ वाहक/यांत्रिक व प्रशासकीय कर्मचार्यांचे कौतुक केले. यावेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले, यावेळी आगारातील अधिकारी सिध्दार्थ चंदनकर, परेश बोरसे, नितीन सोनवणे,योगराज पाटील,ए टी पवार,तसेच स्थानिक समिती सदस्य पत्रकार श्रीकांत नेवे,भगवान नायदे, चंद्रभान रायसिंग, संजय सोनवणे, नरेंद्र जोशी , दीपक पाटील व महिला/ पुरुष कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रमुख कारागीर प्रभाकर महाजन यांनी तर आभार वरिष्ठ लिपिक डी. डी. चावरे यांनी मानले.
