ताज्या बातम्या

चोपडा-गणपूर येथे एकलव्य संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण

चोपडा (लतीश जैन)

चोपडा तालुक्यातील गणपूर येथे क्रांती दिवस व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधत एकलव्य संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण व वीर एकलव्य प्रतिमा स्तंभाचे उदघाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.सायंकाळी वीर एकलव्य यांच्या व आदिवासी समाज भूषण ठरलेल्या पूर्वजांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सखाराम सोनवणे,बापू मोरे व संघटना पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.

समाजाने आता एक व्हावे त्यासाठी व समाज हितासाठी व अडीअडचणीसाठी आपण केव्हाही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही ढवळे यांनी यावेळी बोलतांना समाज बांधवांना दिली. दिली.संभाजी पाटील,ऍड बाळकृष्ण पाटील,गुलाबराव पाटील,आत्माराम पाटील यावेळी उपस्थित होते.स्थानिक अध्यक्ष मगन भिल ,ज्योतिसिंग भिल, राजेंद्र भिल,उमेश सनेर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *