ताज्या बातम्या
चोपडा ग्रामीण पोलिसांनी मराठे गावाजवळ गांजा पकडला ; आरोपीस अटक
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा – तालुक्यातील अनेर डॅम ते गणपुर च्या दरम्यान मराठे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक आदिवासी युवक मोटरसायकलवर गांजा घेऊन येत असताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.त्या आरोपीचे नाव कैलास अमरसिंग बारेला (वय 46 मूळ राहणार शिरवेल महादेव मध्य प्रदेश हल्ली मुक्काम कुंड्या पाणी तालुका चोपडा) असे आहे.आरोपी जवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास सात किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. दुचाकीस्वार आरोपीस अटक करण्यात आली असून ६७ हजार रु किमतीचा दुचाकीसह ऐवज जप्त करण्यात आला आहे. a अधिक तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.