ताज्या बातम्या

चोपडा तालुका शासनमान्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी राधेश्याम पाटील व सचिवपदी मनोहर पाटील

प्रतिनिधी- चोपडा तालुका / विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालय संघांच्या अध्यक्ष पदी राधेश्याम गोपाल पाटील ( खर्डी ) ,व सचिवपदी मनोहर गोरख पाटील ( वटार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीप्रसंगी सभेचे अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतिष डी पाटील होते तर प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष रविंद्र पाटील, संजय पाटी ल रावसाहेब पाटील तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकाऱी होते .सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री नरेंद्र पाटील ( लोणी ) यांनी केले. तसेच या निवड प्रसंगी चोपडा तालुक्यातील शासनमन्य सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय पदाधिकाऱी व ग्रंथालय कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यकारिणी खालील प्रमाणे

1 राधेश्याम गोपाल पाटील खर्डी, अध्यक्ष

2 मनोहर गोरख पाटील, वटार, सचिव

3 किरण विठ्ठल बडगुजर अकुलखेडे, उपाध्यक्ष

4 चंद्रकांत रामसिंग बाविस्कर गोरगावले, कार्याध्यक्ष

5 गोपाल शरद दांडेकर चोपडा, सहसचिव

6 देवानंद लक्ष्मण पाटील निमगव्हाण, कोषाध्यक्ष

7 केदार गंगाराम पाटील घाडवेल, सदस्य

8, विठ्ठल पुंडलिक पाटील घोडगाव, सदस्य

9, अनिस अहमद गयासुद्दीन चोपडा, सदस्य

यांची निवड बिनविरोध व एकमताने करण्यात आली. या निवडी बद्दल त्याचा अडावद व चोपडा परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *