ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील नागरीकांच्या विविध समस्यांबाबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी – विनायक पाटील

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात चोपडा गटविकास अधिकारी रमेश वाघ यांना चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील राहणाऱ्या नागरिकांना निर्माण होणाऱ्या मूलभूत समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विद्युत समस्या, घरकुलाच्या समस्या इत्यादी बाबतीत निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर त्वरित मार्ग काढण्यासाठी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले,तसेच सदरील समस्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश व नाराजी शासनाबद्दल असल्याचे ॲड.संदीप सुरेश पाटील यांनी सांगितले यावेळी गटविकास अधिकारी यांनी सदरील कामांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले,यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, गोविंदा बापू महाजन,विकास जनकराव सोनवणे, गुलाब रातु बारेला,सतीश बारेला , प्रमोद बारेला ,विजय बारेला,उखा बारेला, दयाराम बारेला आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *