चोपडा तालुक्यातील घुमावलचे माजी सरपंच यांच्या पुतण्याची आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल…
प्रतिनिधी विनायक पाटील
चोपडा : तालुक्यातील घुमवाल येथील माजी सरपंच वसंतराव प्रेमराज पाटील यांचा पुतण्या मंगेश रेवानंद पाटील हा महेंद्र एकनाथ पाटील यांचा मुली सोबत शाळेचा बस स्टॉप वर बोलत असल्याचे पाहून महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील व पवन मगन पाटील यांनी त्यांचा बोलण्याचा दुराग्रह करत वेगळा संशय घेत मारहाण केली.व जिवे मारण्याची धमकी दिली होती त्या दिवसा पासून सतत मंगेश यास वारंवार धमक्या दिल्या जात असे ही बाब मंगेश याने त्यांचे काका माजी सरपंच वसंतराव पाटील यांना सांगितले असता त्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ११ जून रोजी चोपडा ग्रामीण पोलिसांनी तिन्ही संशयीतांना समज देत सोडून दिले होते दि १३जून रोजी हातवारे करत पुन्हा मंगेश यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्याने वसंतराव पाटील यांना सांगितले या घटने मुळे मंगेश हा सतत डिप्रेशन मधे राहायला लागला होता दि.१६जून रोजी मंगेश याने राहत्या घरी वरच्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली व टेबल वर एका रजिस्टर मधे लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वारंवार मिळणाऱ्या धमकीला कंटाळून त्याचा कडून मरण्या पेक्षा स्वतःच आयुष्य संपवत आहे अश्या आशयाचे पत्र आढळून आले वसंतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून तिन्ही संशयीतांवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भादवी कलम ३०५,३५२,३२४,५०४,५०६,५०७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहे.