ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील युवकाने पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या
प्रतिनिधी – विनायक पाटील
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील भूषण दिलीप पाटील वय २९ याने काल सकाळी धरणगाव रस्त्यावरील पाटचारी उजव्या बाजूला जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या नंतर त्याने चोपडा पोलिसांना दिलेल्या माहितीत, काही अज्ञात तरुणांनी जाळले असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता आणि सीसी टीव्ही चे फुटेज तपासले असता भूषण पाटील खोट बोलत असल्याचे जाणवले त्या नंतर पुढील उपचारासाठी भूषण पाटील याला जळगाव येथे नेण्यात आले होते. जळगाव येथे चोपडा पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जळगाव येथे भूषण याची क्रॉस तपासणी केली असता त्यानेच स्वतःला जाळून घेतल्याचे कबूल केले. त्या नंतर उपचारा दरम्यान संध्याकाळी सात चा सुमारास मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के.के पाटील यांनी पत्रकारांना दिली.