ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारात २०० ब्रास अवैध अवैध वाळू साठा जप्त ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा तालुक्यात अवैद्य वाळू वाहतूक व अवैध वाळू साठा ही काही नवीन नाही तरी महसूल प्रशासनाने चोपडा शहरातील अवैध वाळू साठ्याकडे दुर्लक्ष करत चोपडा तालुक्यातील चहार्डी शिवारातील गट क्र ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील यांचा शेतात विना परवाना साठा केलेली ९लाख ४०हजार रुपये (अंदाजित किंमत )असलेली २०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आले आहे दि. ०९/०७/२०२४ रोजीचे दुपारी १:३० वाजेच्या पूर्वी तारीख व वेळ नक्की माहीती नाही चहार्डी शिवारातील शेत गट नंबर ९०३ शेत मालक गणेश रमेश पाटील व त्यांच्या सोबत ट्रैक्टर किंवा डंपर चालक व मालक रा.चहार्डी ता चोपडा यांनी कुठलीही शासनाची शासकीय परवानगी अथवा अवैध्यरित्या वाळु वाहतुक परवाना नसतांना अवैध्यरित्या गौण खनिज वाहतुक व साठा करुन तिची नदी पात्रातुन शासनाची परवानगी न घेता लबाडीच्या इराद्याने फिर्यादीच्या व शासनाच्या संमती वाचुन चोरून नेली आहे चोरुन घेवून जाऊन तिचा साठा करुन ठेवलेला आहे म्हणुन शेत मालक गणेश रमेश पाटील व ईतर त्यांच्या सोबत त्यांनी वाळू साठा करण्यासाठी लावलेली ट्रैक्टर किवा डंपर मालक व चालक नाव गाव माहीत नाही यांच्या विरुध्द फिर्यादी तलाठी मुकेश सुरेश देसले दिलेल्या फिर्यादवरुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम. ३०३(२), ३(५), सह विकास व विनिमय सह खनिजे १९५७ चे कलम २२, व महाराष्ट्र जमीन महसुन अधिनीयम १९६६ चे कलम,४८(७), (८), आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम, ३ व ११५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचा मार्गदर्शनात उप पोलिस निरीक्षक अनिल भुसारे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *