ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी- विनायक पाटील, चोपडा
चोपडा – तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले असल्यामुळे घरात फक्त लहान दोन्ही लहान मुलींन सोबत एकट्या घरात होत्या. दोन वाजून दहा मिनटांनी दोन्ही मुलींनी आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले. आत्महत्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. महिलेचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन आनण्यात आले होते. शीतल ठाकरे यांचे माहेर हे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील असून तालुक्यातील दोन्ही गावातील नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे गर्दी केली.
पुढील तपास अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जगदीश कोळंबे पुढील तपास करीत आहे.