ताज्या बातम्या

चोपडा नगरपरिषद व शहर पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने “माझी माती, माझा देश” अभियानांतर्गत उद्या भव्य सायकल रॅली

चोपडा (प्रतिनिधी) लतीश जैन

चोपडा – नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी माती, माझा देश ““मातृभूमीला नमन, वीरांना वंदन” उपक्रमांतर्गत देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चोपडा शहरात दि.१३ऑगष्ट २०२३रोजी सकाळी ७:००वाजता भव्य सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील सामाजिक संस्था, प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, व्यापारी, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, महिला,युवा विद्यार्थी वा जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत निकम व शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी केले आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “माझी माती, माझा देश (मातीला नमन, वीरांना वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असून या अंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी हा याअभियानाचा उद्देश आहे. “माझी माती, माझा देश (मातीला नमन, वीरांना वंदन) या अभियानाच्या अनुषंगाने चोपडा नगरपरिषद,शहर पोलीस स्टेशन, चोपडा सायकल रायडर्स, रोटरी क्लब चोपडा, इंडियन मेडीकल असोसिएशन, दिशा फाऊंडेशन, व्यापारी असोसिएशन चोपडा इत्यादींच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी , सर्व संघटनांनी , मंडळांनी सदर सायकल रॅलीत उस्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *