चोपडा बस स्थानक प्रथम क्रमांकावर येणार असे डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दीले आश्वासन
जळगांव जिल्हा- प्रतिनिधी/ विनायक पाटील
चोपडा – महाराष्ट्र शासनाने या वर्षांसाठी लोकसहभागातून हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे बस स्थानक स्वच्छ व सुंदर,सुशोभित करण्यासाठी पत्रकार परिषदेतुन जन माणसा पर्यंत पोहचावी असा महाराष्ट्र शासनाने दिली होती यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे बक्षिस ठेवली आहे. या बक्षिस योजनेत आपल्या सहकार्याने चोपडा बस स्थानकाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवू असे आश्वासन डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्र शासनाने जण सामान्य साठी विविध योजना आणून लालपरीचे चाक अजून जलद व्हावे यासाठी प्रयत्न आहे. महिलांसाठी पन्नास टक्के सूट, जेष्ठ नागरिकाना शंभर टक्के सूट, व शालेय विद्यार्थीना पास मध्ये सूट,अपंगांना सूट,अश्या विविध योजनेद्वारा जनसामान्यांसाठी लालपरी मोलाची ठरावी यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वछ,सुशोभिकरणं बसस्थानकच्या योजनेत सहभागात महाराष्ट्रात सर्व प्रथम क्रमांक यावासाठी डॉ.विकास हरताळकर, डॉ.दिपक पाटील,डॉ नितीन महाजन, भिमान ग्रुप, सागर ओतारी, बापू टी हाऊस, बजरंग टी हाऊस, घनश्यामभाऊ अग्रवाल, यांच्यासह विविध दानदात्या कडून आम्ही मदत मागत आहोत दानदाते आप आपल्या परीने मदत करत आहेत. शासनाच्या विविध योजनेच्या प्रवाशी लाभ घेत आहे यात आता पर्यंत जवळपास 15 लाख 75 हजार महिलांनी, 7 लाख 20 हजार जेष्ठ नागरिकांनी, तर 1500 विद्यार्थी पासचा फायदा घेत आहेत चोपडा डेपो हा नेहमी तोट्यात असणारा कर्मचाऱ्यांचा ,प्रवाशांच्या सहकार्याने व अधिकाऱ्याचा नियोजनाने चोपडा बस स्थानकाने में महिना अखेर 7 लाख रुपये नफ्यात असून जुन अखेर 9 लाख रुपये नफ्यात असून, जुलै अखेर 16 लाख रुपये नफ्यात आहे स्वच्छ बस स्थानक,बसेसचे स्वच्छता, मेंटेनन्स, अद्ययावत प्रसाधन गृह, बसेसची देखभाल,बस स्थानक व्यवस्थापन, रूट फलक, असे सर्व सुरळीत राहिले तर सहा कमेटी येणार आहेत त्यात प्रथम कमेटी येऊन गेली आहे त्या कमेटीने महाराष्ट्रातुन दुसऱ्या क्रमांकाचे मार्क दिले आहेत या दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम क्रमांका पर्यंत दान दात्याच्या मदतीने आम्ही जाऊ शकतो व चोपडा बस स्थानक नव्हे तर चोपड्याचे विमानतळ लागायला हवे असा निर्धार डेपो मॅनेजर महेंद्र पाटील यांनी केला आहे. आता नवीन बसेस येऊन गेल्या तर अजून डेपो फायद्यात राहील. चोपडा डेपोला 20 बसेसची कमतरता जाणवत आहे. यावेळी संदेश क्षीरसागर, भगवान नायदे, डी. डी. चावरे, ए.टी. पवार,नितीन सोनवणे, सिद्धार्थ चंदनकर आदी उपस्थित होते.