चोपडा येथील करोडपती विद्यालयाचे शिक्षक श्री.आशिष बडगुजर यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप
प्रतिनिधी-विनायक पाटील
चोपडा : येथील कै हि.मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक व तंत्रशिक्षक श्री आशिष पितांबर बडगुजर यांना भारतीय दलित साहित्य अकादमी कडून राष्ट्रीय महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप अकादमीचे अध्यक्ष श्री सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते दिल्ली येथे देण्यात आला .आशिष बडगुजरसर हे आदिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ,ऑनलाईन विद्यालयातील माहिती भरणे, क्रीडास्पर्धा विषयी मार्गदर्शन करणे या कामाची दखल अकादमीच्या निदर्शनात आणून देत त्यांचा गौरव करण्यात आला.त्यांना राष्ट्रीय फेलोशिप मिळाल्याबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष बापुसो .विठ्ठल ओंकार पाटील उपाध्यक्ष सोमनाथ जी बडगुजर, सचिव विजय हिरालाल करोडपती , बीडगाव चे चेअरमन प्रा.विनायक पाटील,कै हि .मो करोडपती विद्यालयाचे चेअरमन उमेश करोडपती वसतिगृहाचे चेअरमन पंकज बडगुजर मा.मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर,मुख्याध्यापक मंगेश भोईटे व पी एन पाटील,तसेच सर्व संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केलेले आहे.