ताज्या बातम्या

चोपडा येथील माणक ज्वेलर्स यांनी चोरीचे सोन खरेदी केल्या प्रकरणी 27 तोळे सोन्याची लगड जप्त ; शहादा पोलिसांची कारवाइ

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा दि.२४ रोजी शहरातील प्रतिष्ठित माणक ज्वेलर्स यांचा कडे रात्री साडे दहा वाजेचा सुमारास नंदुरबार स्थानिक गुन्हे शाकेचा टीम ने चोरीचा सोन घेतल्या असल्या प्रकरणी चौकशी साठी माणक ज्वेलर्स चे मालक प्रवीण टाटिया आणि त्याचे चिरंजीव नवीन टाटिया यांना दि 25 रोजी चौकशी कामी नंदुरबार घेऊन गेले होते .या विषयी स्थनिक गुन्हे शाखेचे निरीक्षक खेडकर यांचा कडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही पिता पुत्र यांना पुढील चौकशी साठी शहादा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले असल्याचे सांगितले अधिक माहिती जाणून घेण्याकरता महारष्ट्र9ने शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना संपर्क केला असता मी चार दिवस पासून रजेवर होतो आता पोहचलो असा कुठलाही व्यापारी कडून काही हस्तगत केलं नाही असे सांगितले . माणक ज्वेलर्स से मालक प्रवीण टाटिया यांनी चौकशीत काहीच निष्पन्न झाले नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितल्या नंतर शहादा पोलीस चौकशीत काही निष्पन्न झाले असल्याचे सांगत विषय मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र दि.28 रोजी शहादा पोलीस पुन्हा ॲक्शन मोड वर आली व 30 डिसेंबर रोजी झालेल्या घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपी ला सोबत घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरे हे बारा वाजेचा सुमारास चोपडा येथील माणक ज्वेलर्स यांचा दुकानाचा पंचनामा करत नवीन टाटिया यांना चौकशी कामी पुन्हा शहादा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. चौकशी दरम्यान नवीन तात्या यांचा कडून 27 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे .काय आहे हे प्रकरण…शहादा तालुक्यातील पाडळदा येथील धाडसी चोरी प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून दोन फरार आहेत एकूण पाच जणांच्या टोळीने सदर चोरी केली होती विशेष म्हणजे सुमारे आठ महिन्यानंतर या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी यातील 27 तोळे सोने हस्तगत केले आहेतालुक्यातील पाडळदा येथील वसंत लक्ष्मणदास शहा वय 82 हे आपल्या परिवारासह ऑक्टोबर 2023 या महिन्यात खारघर मुंबई येथील त्यांच्या मुलाकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाट व लॉकर तोडून त्यातील सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता डिसेंबरला शहा यांचा पुतण्या प्रतीक याला घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्याने शहा यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर शहा हे आपल्या कुटुंबासह 30 डिसेंबरला रात्री दहा वाजता पाडळदा येथे परतले त्यांनी घराची पाहणी केली असता सर्वत्र सामान विखुरलेले होते व बेडरूम मधील कपाट व त्याचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी43 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदी असा सुमारे 18 लाख 61 हजार  600 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता याबाबत शहा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात 31 डिसेंबरला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होतासदर धाडसी चोरी पोलिसांसमोर आव्हान ठरली होती यातील चोरट्यांना जरबंद करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली मात्र त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते असे असले तरी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सदर चोरीचा तपास सुरूच ठेवला होता माहिती गारांतर्फे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण चोरीचा छडा लावला याप्रकरणी शहादा पोलिसात  पाच जणांवर पुन्हा नोंदविण्यात आला असून पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी), रा. एकता नगर, नंदुरबार ता.जि. नंदुरबार ( तळोदा पोलीस स्टेशन अटक)राहुलसिंग मोतीसिंग भाटीया, वय२५ वर्षे, रा. ओसवाडा, ता. पानसेमल, जि.बडवाणी, राज्य मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे तर शेरुसींग त्रीलोकसींग शिकलीकर,  राजेंद्रसींग प्रितमसींग शिकलकर, रा.उमर्टी जि. बडवाणी मध्यप्रदेश हे दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत तर एक 17 वर्षीय विधी संघर्ष बालकाचा या टोळीत समावेश आहेसदर चोरीतील सोने संशयितानी चोपडा येथील एका सराफाला विक्री केल्याची कबुली दिली असून आतापर्यंत पंधरा व 17 तोळे वजनाचे अशा सुमारे दोन सुमारे 27 तोळे सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली आहे उर्वरित ऐवज शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली असून या गुन्ह्याची व्याप्ती मध्य प्रदेश राज्यात असल्याने तेथेही तपास केला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेतसदर गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण खेडकर व त्यांच्या पथकाने जेरबंद केले तर चोरीला गेलेला मुद्देमाल पैकी सुमारे 27 तोळे सोने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोपडा येथील माणक ज्वेलर्स चे नवीन टाटिया या सराफा कडून जप्त केले आहे आणखी सोने लवकरच हस्तगत करण्यात येऊन या टोळीकडून जिल्ह्यातील अनेक चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अटकेत असलेला आरोपी राहुल सिंग मोती सिंग भाटिया याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *