ताज्या बातम्या

चोपडा येथील लाचखोर महावितरण अभियंता सुलक्षणे ४५०० रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा येथील महावितरण अभियंता अमित दिलीप सुलक्षणे , वय 35 वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा यांना ४५०० रुपयाची लाच घेताना एसीबी ने रांगेहात पकडले. तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता वर नमूद आ.लो.से. यांनी 5,500/- रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दि.11/3/2025 रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.सदर तक्रारीची पडताळणी केली असताअमित दिलीप सुलक्षणे , वय 35 वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम 5500 व तडजोडअंती 4500 रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम आज दि.12/3/2025 रोजी स्विकारतांना पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने यांनी त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *