चोपडा येथील शासकीय विश्रांमगृह येथे आम आदमी पार्टीची बैठक सपन्न

चोपडा – प्रतिनिधी विनायक पाटील
आज दिनांक 10 /3/2024 रोजी आम आदमी पार्टीची मिटींग शासकीय विश्रांम गृहात झाली असून त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात आवर्जून केजरीवाल साहेब यांच्या सत्ता असलेल्या राज्यात कशा प्रकारे लोकहिताच्या योजना राबवित आहेत त्याबाबत सर्वसामन्या लोकांसाठी अन्न वस्त्र निवारा त्याच बरोबर अतिशय महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण पद्धत बाबत केलेली क्रांती सक्तीचे व उत्तम दर्जाचे शिक्षण तसेच महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना याबाबत सर्व माहिती देण्यात आली तसेच चोपडा तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व मिटींग संपन्न झाली त्यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होतेसोशल मीडिया प्रमुख अर्जून कोळी ता.उपाध्यक्ष. मुकुंद पाटील,बाळू कोळी ,भीमराव उमाळे ,रतन बारेला,अधिकार सोनवणे,डाक्टर विजय गोस्वामी ,प्रकाश सोनवणे, भगवान वाणी ,दिनकर पावरा,सायशिंग पावरा, शरद शिंदे,मोहन सोनवणे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
