ताज्या बातम्या

चोपडा येथील ॲक्सिस बँकेच्या भरण्यात ५०० रुपयाचा २२ बनावटी चलनी नोटा आढळल्या ; चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

15 दिवसात दुसरी घटना व्यापाऱ्यांमध्ये घबराहट

प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा शहरातील ॲक्सिस बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये दि १८मे रोजी ५००रुपयाचा पाच बनावटी चलनी नोटा आढळल्या प्रकरणी गोकुळ सुखदेव सोनवणे राहणार चोपडा यांच्यावर चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसाच प्रकार दि.3 जून रोजी फिर्यादी हर्षल जयविलास जैन वय ४२ वर्ष धंदा नोकरी रा. धरणगाव अर्बन बँकच्या बाजुला चोपडा.यांनी दिलेल्या फिर्याद प्रमाणे चोपडा येथील ॲक्सिस बँकेत मिलाप स्टोरचा चार लाखाचा भरणा करण्या करता त्यांचा कर्मचारी जाहीद मुस्ताक खान वय १८ वर्षे रा. दर्गाअली चोपडा हा गेला असता त्यांने ५०० रु दराचे एकुण ८०० नोटा अशी एकुण ४,००,०००/- रुपये मिलाप स्टोअर्स NX या नावाच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा करण्या करता कॅशियर कडे रोख भरणा दिला असता त्यातील ११०००/- रु. किंमतीचे ५०० रुपये दराचे २२ चलनी नोटा या नकली निघाल्याने सदर बाब लागलीच कॅशियर पहर्षल जैन यांनी कळविल्याने यातील पैसे जमा करणारा इसमास सदर बाब सांगितली असता त्याने त्याचे मिलाप स्टोरचे मालक नितीन मिलापचंद जैन यांना झालेला प्रकार सांगितला व डिपॉझिट चे बनावट नोटांच्या जागेवर ११०००/ रुपये आणून दिल्या नंतर एकुण ४,००,०००/- रुपये नमुदखात्यात जमा केले व नोट सॉटींग मशिनद्वारे बनावट निघालेल्या एकुण ११०००/- रु. किंमतीच्या ५०० रुपये दराच्या २२ बनावटी नकली नोटा भरण्यात आले असल्याचे शाखा व्यवस्थापक उपेंद्र चंद्रभान यादव यांना सांगीतले. सदरच्या चलनी नोटा बनावट असल्याचे खात्री झाल्याने त्या पुढील कार्यवाही करिता रिझर्व बँक ऑफ इंडीयाच्या चे आदेशानुसार शाखा व्यवस्थापक उपेंद्र यादव यांच्या परवानगीने तक्रार देण्यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन जाहीद मुस्ताक खान वय १८ वर्षे रा. दर्गाअली चोपडा ता. चोपडा जि. जळगाव यांचे विरुध्द त्याने त्याचे कब्ज्यातील भारतीय चलनातील ५००/- रुपये दराच्या बनावट २२ नोटा बँक खात्यात जमा करुन चलनात आणल्या, म्हणुन त्याचे विरुध्द भारतीय दंड संहीता कलम ४८९(ब), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहे .पंधरा दिवसात दुसरी घटना घडल्या मुळे व्यापारांमध्ये घबराट पसरली असून बनावटी चलनी नोटा बाजारात कुठून व कसे येत आहे याचा तापस करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *