ताज्या बातम्या

चोपडा-रोटरी क्लबला 12 पुरस्कार, ॲड रुपेश पाटील यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड

लोकनायक न्युज प्रतिनिधी – लतीश जैन

चोपडा – रोटरी वर्ष 2022-23 अवॉर्ड मध्ये चोपडा रोटरी क्लब ला 12 पुरस्कार प्राप्तझाले असून ॲड रुपेश पाटील यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले तसेच सह प्रांतपाल नितीन अहिरराव यांना गव्हर्नर अँप्रेसिएशन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

चोपडा रोटरी क्लबने सन 2022-23 या काळात विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबवून ॲड रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दमदार कामगिरी केली आहे. रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेतर्फे मिळणार्‍या विविध श्रेणीत पुरस्कारांसाठी तत्कालीन अध्यक्ष ॲड रुपेश पाटील यांनी नामांकन दाखल केले होते. तब्बल 12 वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कारांनी चोपडा रोटरी क्लबला सन्मानीत करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील सह प्रांतपाल नितीन अहिरराव सचिव गौरव महाले आणि पृथ्वीराज राजपूत उपस्थित होते.

एकूण 6 जिल्ह्यांतील 101 क्‍लबची संख्या असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 विभागामध्ये समाविष्ट असलेल्या चोपडा रोटरी क्‍लबने यावर्षी बेस्ट प्रेसिडेंट, गव्हर्नर अँप्रेसिएशन अवॉर्ड, बेस्ट वर्क इन रेनवॉटर हार्वेस्टिंग, बेस्ट वर्क फॉर फिजिकली च्यालेंज, बेस्ट आर सी सी ऍक्टिव्हिटी, बेस्ट नॉन मेडिकल प्रोजेक्ट्स, बेस्ट कॉम्युनिटी सर्विस ऍक्टिव्हिटी, ओउटस्टँडिंग वोकॅशनल सर्विस ऍक्टिव्हिटी, उत्कृष्ट उद्योजकता विकास, हायस्ट रेजिस्ट्रेशन फॉर कॉन्फरेन्स, बेस्ट होस्टिंग डिस्ट्रिक्ट मेंबर्स ओरिएंटेशन सेमिनार व रोटरी इंटरनॅशनल सायटेशन अवॉर्ड आदी पुरस्कार प्राप्त केली आहेत.

पुरस्कारांचे वितरण वर्धा येथे माजी प्रांतपाल डॉ.आनंद झूनझुनवाला यांच्याहस्ते तर प्रांतपाल आशा वेणुगोपाल, माजी प्रांतपाल किशोर केडिया, महेश मोकळकर, रमेश मेहेर, शब्बीर शाकीर, राजे संग्रामसिंग भोसले, डॉ.राजन, राजिंदर खुराणा, ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरीचे तात्कालीन अध्यक्ष ॲड रुपेश पाटील व पदाधिकारी सह प्रांतपाल नितीन अहिरराव सचिव गौरव महाले आणि पृथ्वीराज राजपूत यांना प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *