ताज्या बातम्या

चोपडा शहर पोलिसांची कारवाई आरोपी आकाश भोई यास केले स्थानबध्द….!

प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील

चोपडा – शहर तसेच जळगांव जिल्हयामध्ये आगामी सण उत्सव काळात व भविष्यात होण्याऱ्या निवडणुक यादरम्यान सार्वजनिक शांततेचा भंग होवु नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,चाळीसगांव सहा.पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगार यांच्यावरती Crpe तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम,MPDA अशा वेगवेगळ्या कायद्यान्वये सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाई येत आहेतआकाश संतोष भोई वय 24 वर्ष रा. सानेगुरुजी वसाहत चोपडा याचेवर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, रस्ता आडवुन मारहाण करणे तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, किरकोळ तसेच गंभीर दुखापत करणे पळवून नेण्यास मदत करणे या सारखे 5 गुन्हे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे व गुन्हा अमळनेर पोलीस स्टेशन येथे असे एकुण 6 गुन्हे दाखल आहेत त्यास मा. उपविभागीय दंडाधिकारी सो. अमळनेर भाग यांनी दिनांक 18/04/2023 पासुन 2 वर्षाकरीता चोपडा, अमळनेर, यावल, जळगांव, धरणगांव, शिरपुर व नंदुरबार या तालुक्यामधुन हद्दपार केलेले आहे. परंतु तरी देखील हद्दपार आदेशाचे उल्लघंन करुन हद्दपार आदेशास न जुमानता त्याने वेळोवेळी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना येवून गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.त्यावरती वेळोवेळी Crpe तसचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तणुकीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती म्हणुन त्याचेवरती महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम सन 1981 (महाराष्ट्राचा कायदा क्रमांक 55 सन 1981) अन्वये स्थानबध्द करणे बाबत (MPDA) अन्वये कारवाई करण्यात आलेली असुन त्यास मा. जिल्हाधिकारी सो.जळगांव यांच्या आदेशान्वये स्थानबध्द करण्यात आलेले असुन त्यास आज दिनांक 18/08/2023 रोजी मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल केलेले आहे.सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, स.फौ.सुनिल पाटील, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोकों प्रकाश मथुरे, पोकॉ हंसराज कोळी, पोकॉ रविंद्र पाटील यांनी केलेली असुन त्यास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व पोहेकॉ दामोदरे स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी मदत केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *